तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात किडींचा प्रसार कमी करण्यासाठी पिकांची फेरपालट अत्यंत महत्त्वाची आहे. दरवर्षी एकाच शेतात ज्वारी न लावता तूर, हरभरा किंवा तेलबिया यांसारखी पिके घ्यावीत. यामुळे मातीतील कीड अळ्यांचा जीवनचक्र तुटतो. तसेच शेतातील उरलेले पिकांचे अवशेष, तण आणि कोरडी खोडे वेळेवर काढून टाकावीत, कारण हिवाळ्यात याच ठिकाणी किडी लपून राहतात. या साध्या उपायांनी कीड नियंत्रणात मोठ्या प्रमाणावर मदत होते.
advertisement
Beed News: लग्नाच आमंत्रण आलं अन् लाखो रुपयांना गंडवलं, बीडच्या व्यापाऱ्याला कसा लागला चुना?
बी पेरण्यापूर्वी बियाण्यांवर थायोमिथॉक्साम या औषधाने बीजप्रक्रिया करावी, असे कृषी अधिकारी सांगतात. एका किलो बियाण्यासाठी 10 मि.ली. औषध वापरल्यास सुरुवातीच्या टप्प्यात कीड लागू शकत नाही. तसेच पिकाची नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. ज्या शेतांमध्ये पानगुंडी किंवा खोडकिडा दिसतो, तिथे लगेच फवारणी करावी.
किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास 10 लिटर पाण्यात 2 मि.ली. सायपरमेथ्रीन (Cypermethrin 25 EC) किंवा क्विनालफॉस (Quinalphos 25 EC) मिसळून फवारणी करावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी केल्यास तिचा परिणाम अधिक चांगला होतो. नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी बर्ड पर्च म्हणजेच पक्ष्यांना बसण्यासाठी बांबू आणि दोऱ्यांचे आधार शेतात लावणेही उपयुक्त ठरते, कारण हे पक्षी किड्या खातात.
सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नीम अर्क किंवा नीम तेल (५%) फवारणी हा उत्तम पर्याय मानला जातो. कृषी तज्ज्ञांच्या मते, या सर्व उपायांचा एकत्रित वापर केल्यास हिवाळ्यात ज्वारीवरील किडींचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. यामुळे उत्पादनात स्थिरता येते आणि शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. त्यामुळे वेळेत कीडनियंत्रणाचे नियोजन करणे हेच ज्वारी पिकातील यशाचे खरे रहस्य ठरत आहे.





