Beed News: लग्नाच आमंत्रण आलं अन् लाखो रुपयांना गंडवलं, बीडच्या व्यापाऱ्याला कसा लागला चुना?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
आधुनिक डिजिटल युगात ‘व्हॉट्सॲप’ हे संवादाचं सर्वात जलद माध्यम बनलं असलं तरी आता त्याचाच वापर करून सायबर गुन्हेगार लोकांना जाळ्यात ओढत आहेत. अशाच एका प्रकरणात अंबाजोगाईतील एका व्यापाऱ्याचा व्हॉट्सॲप हॅक झाला आणि त्याच्या बँक खात्यातून एका झटक्यात हजारो रुपये गायब झाले.
आधुनिक डिजिटल युगात ‘व्हॉट्सॲप’ हे संवादाचं सर्वात जलद माध्यम बनलं आहे. टेक्नोलॉजीच्या बाबतीत सर्वात जलद असणाऱ्या ‘व्हॉट्सॲप मेसेंजर’च्या माध्यमातून अनेक सायबर गुन्हेगार लोकांना जाळ्यात ओढत आहेत. अशाच एका प्रकरणात अंबाजोगाईतील एका व्यापाऱ्याचे ‘व्हॉट्सॲप’ हॅक झाले आहे. आणि त्याच्या बँक खात्यातून तब्बल 97 हजार 500 रुपये एका क्लिकवर गायब झाले आहेत. ‘वेडिंग इनव्हिटेशन कार्ड.apk’ या फाईलने हा सर्व प्रकार घडवून आणला.
निलेश प्रकाश मुथारा. गुरुवार पेठ अंबाजोगाई येथील या व्यापाऱ्याला 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी त्यांच्या एका मित्राच्या मोबाइल नंबरवरून एक व्हॉट्सॲप मेसेज आला. त्या मेसेजसोबत ‘वेडिंग इनव्हिटेशन कार्ड.apk’ नावाची फाईल होती. मित्राकडून आलेला मेसेज असल्याने मुथा यांनी तो संशय न घेता उघडला. फाईल उघडताच काही क्षणांतच त्यांचा मोबाइल प्रतिसाद देणं बंद झालं. काही वेळातच त्यांना सिमकार्ड दुसऱ्या डिव्हाइसवर लॉगिन झाल्याचा मेसेज आला आणि रात्री 11 ते मध्यरात्री 01:30 या वेळेत त्यांच्या बँक खात्यातून सलग 12 व्यवहार झाले.
advertisement
फक्त एका क्लिकमध्ये त्यांच्या 'बँक ऑफ बडोदा' या बँक खात्यातून 97,500 रुपयांची रक्कम गायब झाली. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुथा यांनी तत्काळ बँक कॉल सेंटरशी संपर्क साधला आणि 1930 सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. त्यानंतर बीड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेनंतर सायबर तज्ञांनी इशारा दिला आहे की, व्हॉट्सॲपवरून आलेली कोणतीही फाईल, विशेषतः .apk असलेली कधीही डाउनलोड किंवा उघडू नये. अशा फाईल्समध्ये व्हायरस किंवा हॅकिंग सॉफ्टवेअर असतं, जे मोबाइलवरील डेटा, पासवर्ड आणि बँक अॅप्सची माहिती थेट हॅकर्सकडे पोहोचवते. जरी ती फाईल आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून आली असली, तरी ती बनावट असण्याची शक्यता असते.
advertisement
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा फाईलवर क्लिक करण्याआधी सत्यता तपासावी. फोन हॅक झाल्यास त्वरित इंटरनेट बंद करून बँकेशी संपर्क साधावा आणि 1930 सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी. अंबाजोगाईतील या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की व्हॉट्सॲपवरील एक निष्काळजी क्लिक कधी हजारोंचा फटका देऊ शकतं. त्यामुळे डिजिटल जगात सजगता आणि सावधगिरी हीच खरी सुरक्षा आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 07, 2025 2:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: लग्नाच आमंत्रण आलं अन् लाखो रुपयांना गंडवलं, बीडच्या व्यापाऱ्याला कसा लागला चुना?


