दरवर्षी वेगवेगळ्या हुरड्याच्या वाणांची लागवड शेतकरी शेतामध्ये करतात आणि मोठ्या प्रमाणावर हुरड्याचं उत्पादन घेतात. यंदा देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गुळभेंडीसह अनेक हुरड्याच्या वाणांची लागवड केली होती. परंतु सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे हुरडा पिकाचे प्रचंड नुकसान झालं. यामुळेच बाजारामध्ये अतिशय अल्प प्रमाणात हुरडा उपलब्धता आहे. वाढलेली मागणी आणि घटलेली आवक यामुळे भावात तेजी आहे.
advertisement
लाल सोन्यानं मार्केट खाल्लं! डाळिंबाला उच्चांकी दर, पुण्यात किलोला किती मिळाला भाव? Video
किरकोळ बाजारात हुरडा 400 रुपये प्रति किलो या भावाने विक्री होतोय. तर ठोक बाजारात 300 ते 350 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय, असं शेतकरी जनार्धन गिराम यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
दरम्यान हुरड्याला कृषी पर्यटन केंद्रे आणि हॉटेल व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतु आवक कमी असल्याने बाजारात हुरडा मिळणे दुरापास्त झालाय. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात दहा ते पंधरा हुरडा विक्रेते दरवर्षी हुरडा विक्रीसाठी येत असत. परंतु यंदा हीच संख्या केवळ दोन ते तीन विक्रेत्यांवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे झणझणीत असा हुरडा खायचा असेल तर जास्त किंमत मोजण्याची तयारी ग्राहकांना ठेवावी लागणार आहे अन्यथा यंदा तरी हुरड्याची चव ग्राहकांना चाखता येणार नाही.





