TRENDING:

Soil Testing : जमिनीत उत्पन्न कमी निघतंय? मग सरकारच्या 'मृदा आरोग्य कार्ड' योजनेचा लाभ घ्या, अर्ज प्रक्रिया, फायदे

Last Updated:

Soil Health Card Scheme : 19 फेब्रुवारी 2015 रोजी भारत सरकारने मातीच्या आरोग्याशी संबंधित योजना सुरू केली आहे. ही योजना मृदा आरोग्य कार्ड म्हणून ओळखली जात आहे. जमिनीच्या आरोग्याची सद्यस्थिती जाणून घेणे आणि त्याचे मूल्यांकन करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जमिनीत पोषक तत्वांची कमतरता असल्यास मृदा आरोग्य कार्डाच्या मदतीने शेतकरी ती कमतरता दूर करू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 19 फेब्रुवारी 2015 रोजी भारत सरकारने मातीच्या आरोग्याशी संबंधित योजना सुरू केली आहे. ही योजना मृदा आरोग्य कार्ड म्हणून ओळखली जात आहे. जमिनीच्या आरोग्याची सद्यस्थिती जाणून घेणे आणि त्याचे मूल्यांकन करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जमिनीत पोषक तत्वांची कमतरता असल्यास मृदा आरोग्य कार्डाच्या मदतीने शेतकरी ती कमतरता दूर करू शकतात, असे शासनाकडून सांगण्यात आले. हे कार्ड भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत चालवले जात आहे. तसेच, ते प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे.
 'मृदा आरोग्य कार्ड' योजनेचा लाभ घ्या
'मृदा आरोग्य कार्ड' योजनेचा लाभ घ्या
advertisement

शेतकऱ्यांना काय फायदा होतो?

तज्ज्ञांच्या मते, मृदा आरोग्य कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर योजना आहे. ते म्हणतात की भारतात असे बरेच शेतकरी आहेत ज्यांना माहित नाही की ते जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी कोणत्या प्रकारची पिके लावू शकतात. किंबहुना त्यांना त्यांच्या मातीचा दर्जा आणि प्रकार माहीत नाही. कोणती पिके वाढतात आणि कोणती पिके अयशस्वी होतात हे त्यांना अनुभवावरून कळू शकते. पण मातीची स्थिती सुधारण्यासाठी ते काय करू शकतात हे त्यांना माहीत नाही. मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मातीची माहिती हेल्थ कार्डद्वारे द्यावी लागते. ही माहिती देण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांचे पीक आणि उत्पादन सुधारणे हा आहे जेणेकरून शेतकऱ्यांना नफा मिळू शकेल.

advertisement

कोणती कागदपत्रे आवश्यक असतात 

या योजनेद्वारे सरकारला सुमारे 14 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे. शेतकऱ्यांना दर तीन वर्षांनी मातीची चाचणी करून घ्यावी लागते जेणेकरून तिची गुणवत्ता कळू शकेल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रिपोर्ट कार्ड देखील दिले जाते ज्याच्या मदतीने ते आपली जमीन सुपीक बनवू शकतात. एखाद्या शेतकऱ्याला माती आरोग्य कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे.

advertisement

अर्ज कसा करायचा?

1) इच्छुक शेतकऱ्याला प्रथम https://soilhealth.dac.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे लागेल.

2) यानंतर तुम्हाला होम पेजवर क्लिक करावे लागेल आणि तुमचे राज्य निवडावे लागेल.

3) तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणी फॉर्म भरावा लागेल.

4) नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर ते सादर करावे लागेल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

advertisement

5) नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एक युनिक यूआयडी नंबर मिळेल, म्हणजेच युनिक रजिस्ट्रेशन नंबर.

कार्ड कसे बनवले जाईल?

हा फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल आणि त्यानंतर शेतकरी मातीच्या नमुन्यांची स्थिती वेबसाइटवर पडताळू शकतील. त्यांना लॉग इन करण्याची गरज भासणार नाही. ते फक्त त्यांच्या गावाचे नाव, उपजिल्हा, जिल्हा, राज्य, नाव आणि माती नोंदणी क्रमांक निवडून मातीची स्थिती तपासू शकतात. शासनाने नोंदणी आणि प्रमाणपत्र दिल्यानंतर शेतकरी त्यांचे मृदा आरोग्य कार्ड इंटरनेटवरून प्रिंट करू शकतात. 'प्रिंट सॉईल हेल्थ कार्ड' टॅबवर क्लिक करून, ते त्यांचे कार्ड इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये मिळवू शकतात.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Soil Testing : जमिनीत उत्पन्न कमी निघतंय? मग सरकारच्या 'मृदा आरोग्य कार्ड' योजनेचा लाभ घ्या, अर्ज प्रक्रिया, फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल