मिनी ट्रॅक्टर हा ज्या ठिकाणी मोठा ट्रॅक्टर किंवा बैलजोडी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी किंवा फळबागेच्या ठिकाणी या ट्रॅक्टरचा उपयोग करता येईल. हा ट्रॅक्टर कमी पैशात मिळणार असून याला वापरण्यासाठी खर्च देखील कमी लागणार आहे. हे मिनी ट्रॅक्टर तयार करायला साधारणपणे दोन महिने वेळ लागलेला आहे. ट्रॅक्टर बनवण्यासाठी खर्च 1 लाख 10 हजार रुपये इतका लागला आहे. आतापर्यंतचा सर्वात लहान आणि छोटा ट्रॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
Amravati Rain: अमरावतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला, शेतातला Video
एक-एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आपोआप मार्ग दिसतो, त्यामुळे ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच ठिकाणी पूर्णपणे वेळ देऊन, मेहनत करून हाती घेतलेले काम साकार करण्यासाठी प्रयत्न करायला हवा तेव्हा यश नक्कीच मिळते तसे सतीश सांगतो. मिनी ट्रॅक्टरच्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून या ट्रॅक्टर संदर्भात विचारणा करण्यासाठी अनेक नागरिक आणि कारागीर त्याच्याकडे येत आहेत.
शासनाने कामाची दखल घेऊन छोटी कंपनी उभारण्यास मदत केली तर नक्कीच मिनी ट्रॅक्टर तयार करून शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम करायला आवडेल असे त्याचे म्हणणे आहे. यापूर्वीही सतीशने हेलिकॉप्टर बनवला होता, सध्या मिनी रेल्वे आणि मिनी थार गाडी बनवण्याचे काम देखील सुरू असल्याचे त्याने सांगितलेय.
मिनी ट्रॅक्टर कसे बनवले?
मोठा ट्रॅक्टर किंवा बैलजोडी अरुंद जागेत किंवा बागायती शेतीत उपयोगी ठरत नाही हे लक्षात घेता सतीश मुंडे याने हा प्रयोग हाती घेतला. सुरुवातीला डिझाईन आणि आकाराचा आराखडा तयार करून छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारातून सुटे पार्ट्स गोळा करण्यात आले. वेल्डिंग, कटिंग आणि जॉईंट्सच्या साहाय्याने ट्रॅक्टरची रचना उभी करण्यात आली. तसेच बारामतीहून मिनी ट्रॅक्टर साठी विशेष टायर बनवून आणलेले आहे. या संपूर्ण प्रक्रियेस साधारण दोन महिने लागले तर एकूण खर्च 1 लाख 10 हजार रुपये इतका आला.





