फोर व्हीलरच्या लायसन्सवर ट्रॅक्टर चालवता येतो का? RTO चा नियम काय सांगतो?

Last Updated:

Tractor License : आजच्या काळात बहुतांश शेतकऱ्यांकडे स्वतःचा ट्रॅक्टर आहे. काहीजण शेतीसाठी, तर काहीजण व्यावसायिक वापरासाठी ट्रॅक्टर वापरतात. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडतो की, फोर व्हीलरच्या (LMV) लायसन्सवर ट्रॅक्टर चालवता येतो का?” याच प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत

tractor news
tractor news
मुंबई : आजच्या काळात बहुतांश शेतकऱ्यांकडे स्वतःचा ट्रॅक्टर आहे. काहीजण शेतीसाठी तर काहीजण व्यावसायिक वापरासाठी ट्रॅक्टर वापरतात. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडतो की, फोर व्हीलरच्या (LMV) लायसन्सवर ट्रॅक्टर चालवता येतो का? याच प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
RTO चा नियम काय सांगतो?
भारतीय मोटार वाहन अधिनियम 1988 आणि मोटार वाहन नियम 1989 नुसार, ट्रॅक्टर हा Light Motor Vehicle (LMV) या वर्गात मोडतो, पण तो “नॉन-ट्रान्सपोर्ट” की “ट्रान्सपोर्ट” या वर्गात येतो, हे त्याच्या वापरावर अवलंबून असतं. म्हणजेच, ट्रॅक्टर शेतीसाठी वापरला जातो की व्यावसायिक कारणांसाठी, हे महत्त्वाचं ठरतं.
जर ट्रॅक्टरचा वापर फक्त शेतीसाठी (Agricultural Purpose) होत असेल, म्हणजे नांगरणी, पेरणी, फवारणी किंवा शेतातील सामान वाहून नेणे अशा कृषी कामांसाठीच तो वापरला जात असेल, तर तो “LMV – Non Transport” या वर्गात गणला जातो. अशा वेळी तुमचं फोर व्हीलर (LMV Non Transport) लायसन्स ट्रॅक्टर चालवण्यासाठी पुरेसं आहे. म्हणजेच, तुमचं कार चालवण्याचं लायसन्स असेल, तरी तुम्ही शेतीसाठी ट्रॅक्टर चालवू शकता.
advertisement
पण जर ट्रॅक्टरचा वापर मालवाहतूक, बांधकाम, कंत्राटी कामे किंवा ट्रेलरने वस्तू वाहून नेण्यासाठी होत असेल, तर परिस्थिती वेगळी असते. अशा वेळी ट्रॅक्टर “ट्रान्सपोर्ट वाहन (Commercial Vehicle)” म्हणून गणला जातो. त्यासाठी साधं LMV लायसन्स चालत नाही. त्या ऐवजी चालकाकडे Commercial (Transport) Driving Licence असणं आवश्यक असतं.
अन्यथा दंड भरावा लागणार
वाहतूक नियमांनुसार, व्यावसायिक ट्रॅक्टर चालवताना चुकीच्या लायसन्सवर वाहन चालवले, तर वाहतूक कायद्याचा भंग मानला जातो. अपघात झाल्यास विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास नकार देऊ शकते. शिवाय RTO कडून दंड, परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाईही होऊ शकते. त्यामुळे वापराच्या प्रकारानुसार योग्य लायसन्स असणं आवश्यक आहे.
advertisement
ट्रॅक्टर चालवण्यासाठी अर्ज करताना वाहनाचा प्रकार (Agricultural किंवा Commercial) स्पष्टपणे नमूद करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांसाठी LMV (Non-Transport) लायसन्स मिळवणं सोपं आहे, पण व्यावसायिक वापरासाठी Transport Licence घेण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय चाचणी, प्रशिक्षण आणि RTO ड्रायव्हिंग टेस्ट आवश्यक असते.
एकूणच काय तर, तुम्ही ट्रॅक्टर केवळ शेतीसाठी वापरत असाल, तर तुमचं फोर व्हीलर लायसन्स चालेल. पण जर तुम्ही तोच ट्रॅक्टर व्यावसायिक कामासाठी वापरत असाल, तर योग्य लायसन्स घेणं अत्यावश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
फोर व्हीलरच्या लायसन्सवर ट्रॅक्टर चालवता येतो का? RTO चा नियम काय सांगतो?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement