मक्याचे दर गडगडले
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 45 हजार 311 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 8 हजार 532 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1330 ते जास्तीत जास्त 2070 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
Mahindra Thar Roxx चक्क गाढवाला जुंपली, पुणेकर शेतकऱ्याने SUV ची काढली शोरूमच्या दारात वरात!
कांद्याची उच्चांकी आवक मात्र भाव दबावातच
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 98 हजार 137 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 96 हजार 085 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 386 ते 1866 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 637 क्विंटल कांद्यास 200 ते 3350 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 82 हजार 470 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी वाशिम मार्केटमध्ये सर्वाधिक 20 हजार क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4010 ते 4600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 900 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4063 ते 6385 प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





