वास्तुशास्त्रानुसार, शौचालय बांधण्यासाठी सर्वात योग्य दिशा वायव्य (उत्तर-पश्चिम) आणि दक्षिण आहेत. वायव्य दिशा ही दिशा वाऱ्याची आणि मोकळ्या जागेची दिशा मानली जाते, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. तर दक्षिण दिशेचा संबंध विसर्जनाशी असतो, त्यामुळे या ठिकाणी शौचालय असणे शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त पश्चिम दिशा देखील वॉशरुमसाठी चांगली मानली जाते.
advertisement
कोणत्या दिशा टाळाव्या - काही दिशांना वॉशरुम असू नये, असे सांगितले जाते. त्यामध्ये ईशान्य ही देवाची दिशा मानली जाते. या दिशेला शौचालय असल्यास आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच उत्तर ही दिशा धन आणि करिअरची मानली जाते. येथे शौचालय असल्यास आर्थिक अडचणी आणि नोकरी-व्यवसायात प्रगती खुंटते. आग्नेय ही दिशा अग्नीची असते. येथे शौचालय असल्यास घरातील सदस्यांमध्ये वाद, आरोग्य समस्या आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.
नैऋत्य दिशेचा संबंध नातेसंबंध आणि स्थैर्याशी असतो. येथे शौचालय असल्यास कौटुंबिक संबंधांमध्ये तणाव आणि जीवनात अस्थिरता येऊ शकते.
वास्तूदोष! देव्हाऱ्याच्या बाबतीत या चुका करू नयेत; नंतर नुसता पश्चाताप होतो
चुकीच्या दिशेला वॉशरुम असल्यास...
कुटुंबातील लोकांना आर्थिक नुकसान, कर्जाचा बोजा आणि व्यवसायात अपयश येऊ शकते. घरातील व्यक्तींना वारंवार आजारपण, पचनसंस्थेचे विकार, डोळ्यांचे विकार आणि मानसिक तणावाचा सोसावा लागतो. पती-पत्नी किंवा घरातील इतर व्यक्तींमध्ये वारंवार वाद आणि गैरसमज निर्माण होतात. करिअरमध्ये प्रगती होत नाही, पदोन्नती थांबते आणि कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येतात.
जर तुमच्या घरात शौचालय चुकीच्या दिशेला असेल, तर काही सोपे उपाय करून नकारात्मक प्रभाव कमी करता येतो. जसे की, शौचालयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे, आतमध्ये एक लहान वाटीत मीठ ठेवणे आणि बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवणे.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)