शुभ ऊर्जेशी जोडण्यासाठी योग्य -
ज्योतिषांच्या मते, ब्रह्म मुहूर्ताचा काळ सर्वात महत्वाचा मानला जातो आणि तो सूर्योदयापूर्वी सुमारे १.५ तास असतो. या वेळी भौतिक आणि आध्यात्मिक जगामधील अंतर सर्वात कमी असते, त्यांच्याशी जोडण्यासाठी हा काळ सर्वात योग्य असतो. तुम्ही या वेळात जागे झालात तर ही जागृती दैवी ऊर्जा किंवा उच्च दैवी शक्तींशी संबंधित असू शकते.
advertisement
यंदाच्या रक्षाबंधनला भद्रकाळ नाही! राखी बांधण्याचा अचूक शुभ मुहूर्त जाणून घ्या
काही लोक कधीकधी ब्रह्म मुहूर्तावर उठतात किंवा अलार्म न वाजताही उठतात. असं अचानक जागे झालात तर घाबरून जाण्याची गरज नाही, उलट तुम्ही खुश व्हायला पाहिजे. ज्योतिषशास्त्रात हा प्रसंग खूप शुभ मानला जातो. या काळात अनेक शुभ ऊर्जा असतात, ज्या तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात.
निसर्ग तुम्हाला शुभ संकेत देतो - ज्योतिष तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान उठत असाल तर निसर्ग तुम्हाला एक संदेश देत आहे. जणू निसर्ग तुम्हाला सांगत आहे, जागे व्हा आणि या वेळेचा पुरेपूर वापर करा. या काळात सकारात्मक ऊर्जा खूप उच्च असते, ज्याचा फायदा दैनंदिन जीवनात होतो. तुमचे मन किंवा आत्मा काही आध्यात्मिक जागृतीकडे वाटचाल करत आहे.
या वेळात जागे झाल्यास लगेच हे काम करा - ज्योतिषांनी पुढे सांगितले की, जर तुम्ही या वेळात जागे झालात तर तुम्ही प्रथम तुमच्या इष्ट देवतेची प्रार्थना करावी. देवाचे नामस्मरण करावे, यामुळे तुम्हाला ५ पट जास्त फायदे मिळतील. तुम्हाला काय करावे हे समजत नसेल, तर तुम्ही शांत बसून तुमच्या इष्ट देवाचे (निवडलेले देवता) जसे की हरे राम हरे राम, कृष्ण कृष्ण किंवा नमः शिवाय असा जप करू शकता, याचाही फायदा होईल.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)