मेष (Aries): मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींनी आपल्या पर्समध्ये तांब्याचे एक छोटे नाणे ठेवावे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. लाल रंगाचा कागद किंवा छोटा रुमाल ठेवणेही तुमच्यासाठी शुभ ठरेल.
वृषभ (Taurus): वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून ही रास वैभवाचे प्रतीक आहे. प्रगतीसाठी तुम्ही पर्समध्ये चांदीचे नाणे किंवा कमळाचे बी ठेवावे. यामुळे पैशांची आवक स्थिर राहते आणि विनाकारण होणारा खर्च कमी होतो. पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची पर्स वापरणे तुमच्यासाठी उत्तम आहे.
advertisement
मिथुन (Gemini): मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. आर्थिक समृद्धीसाठी तुम्ही तुमच्या पर्समध्ये हिरवी वेलची किंवा हिरव्या रंगाचा रेशमी कापडाचा तुकडा ठेवावा. यामुळे तुमच्या संवादातून होणारे व्यवहार यशस्वी होतात आणि व्यवसायात प्रगती होते.
कर्क (Cancer): कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी मानसिक शांती आणि धनवृद्धीसाठी पर्समध्ये एक छोटा पांढरा मोती किंवा चांदीचा चौरस तुकडा ठेवावा. यामुळे आर्थिक चणचण जाणवत नाही.
सिंह (Leo): सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. प्रगतीसाठी तुम्ही पर्समध्ये सोनेरी रंगाचा कागद किंवा 'सूर्य यंत्र' ठेवावे. यामुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळतो आणि सरकारी कामातील अडथळे दूर होतात.
कन्या (Virgo): कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या पर्समध्ये हिरवी बडीशेप किंवा पाचूचे रत्न ठेवावे. हिरवी बडीशेप एका पुडीत बांधून ठेवल्यास तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील.
तूळ (Libra): तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. जीवनात संतुलन आणि सुख-समृद्धीसाठी तुम्ही पर्समध्ये चांदीचे श्रीयंत्र किंवा अत्तर लावलेला कापूस ठेवावा. यामुळे लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते.
वृश्चिक (Scorpio): मंगळ स्वामी असलेल्या या राशीच्या व्यक्तींनी पर्समध्ये लाल चंदनाचा छोटा तुकडा किंवा तांब्याचे नाणे ठेवावे. यामुळे तुमची संकटांपासून सुटका होते आणि अनपेक्षित धनलाभ होतो.
धनु (Sagittarius): धनु राशीचा स्वामी गुरु आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पर्समध्ये हळदीचा एक छोटा तुकडा किंवा पिवळ्या रंगाचा कागद ठेवावा. यामुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील.
मकर (Capricorn): शनी स्वामी असलेल्या मकर राशीच्या लोकांनी पर्समध्ये लोखंडाचे छोटे नाणे किंवा काळ्या रंगाचा रेशमी धागा ठेवावा. यामुळे शनीचा शुभ आशीर्वाद मिळतो आणि मेहनतीचे योग्य फळ मिळते.
कुंभ (Aquarius): कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या पर्समध्ये मोरपीस किंवा निळ्या रंगाचा खडा ठेवावा. यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग सापडतात.
मीन (Pisces): मीन राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी पर्समध्ये केशर किंवा सोन्याचे लहान नाणे ठेवावे. यामुळे तुमची आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगती एकाच वेळी होते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
