TRENDING:

Astrology: बुधादित्य राजयोग! जानेवारीच्या उत्तरार्धात या राशींचा बोलबाला; शत्रु फक्त पाहतच राहतील

Last Updated:

Astrology: जानेवारीच्या उत्तरार्धात 3 राशींना सर्वात जास्त फायदा होणार आहे. त्यांचा सुवर्णकाळ सुरू होईल आणि नोकरी आणि व्यवसायात त्यांना प्रचंड प्रगती साधण्याची संधी मिळेल. जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मकर संक्रातीला सूर्याने मकर राशीत प्रवेश केला. आता 21 जानेवारीला ग्रहांचा सेनापती म्हणजेच मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 24 जानेवारीला बुध राशीपरिवर्तन करेल आणि सूर्यासोबत मकर राशीत येईल. यामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे.
Budhaditya Raja Yoga: बुधादित्य राजयोग! जानेवारीच्या उत्तरार्धात या राशींचा बोलबाला; शत्रु फक्त पाहतच राहतील
Budhaditya Raja Yoga: बुधादित्य राजयोग! जानेवारीच्या उत्तरार्धात या राशींचा बोलबाला; शत्रु फक्त पाहतच राहतील
advertisement

राजयोग 28 जानेवारी रोजी तयार होईल. बुध, सूर्य, मंगळ आणि शुक्राकडून अनेकांचे कल्याण करणारे शुभ ग्रहमान आहे. जानेवारीच्या उत्तरार्धात 3 राशींना सर्वात जास्त फायदा होणार आहे. त्यांचा सुवर्णकाळ सुरू होईल आणि नोकरी आणि व्यवसायात त्यांना प्रचंड प्रगती साधण्याची संधी मिळेल. जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.

महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, 28 जानेवारीला शुक्राची राशी बदलेल आणि शुक्र त्याच्या उच्च मीन राशीत प्रवेश करेल. या ग्रहांच्या हालचालीतील बदल काही राशींचे भाग्य उजळवू शकतात. तसेच, या राशींचे करिअर आणि व्यवसाय चमकू शकतो.

advertisement

तूळ - या राशीच्या लोकांना जानेवारीमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यांचे दीर्घकाळचे प्रश्न सुटू शकतात. तुमच्या आर्थिक समस्या कमी होऊ लागतील. घरी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे प्रलंबित काम पुढे सरकू शकते.

फेब्रुवारीत या राशींचा करिष्मा! ग्रहांचा राजकुमार दोनदा भरभरून देणार, धनलाभ

advertisement

मकर - जानेवारी 2025 मध्ये 4 ग्रहांची चाल बदलणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत रोमँटिक ठिकाणीही जाऊ शकता. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ही योग्य वेळ असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

मेष - वर्षाच्या पहिल्या महिन्यात 4 शक्तिशाली ग्रहांचे संक्रमण तुमच्या राशीसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. जानेवारीपासून तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवतील. नवीन प्रकल्पात पैसे गुंतवू शकता. तुम्हाला पीएफ किंवा विम्याचे पैसे मिळू शकतात. तुम्ही नवीन कार देखील खरेदी करू शकता.

advertisement

ताडकेफाड! जिथल्या तिथं बोलून रिकाम्या; या मूलांकाच्या स्त्रियांचा राग म्हणजे जाळ

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: बुधादित्य राजयोग! जानेवारीच्या उत्तरार्धात या राशींचा बोलबाला; शत्रु फक्त पाहतच राहतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल