दिसणं आणि शारीरिक ठेवण
कर्क राशीच्या व्यक्तींचा चेहरा सहसा गोल किंवा अंडाकृती असतो, जो चंद्राच्या प्रतिबंबासारखा भासतो. यांचे डोळे अत्यंत मोहक आणि पाणीदार असतात, ज्यातून त्यांच्या भावना स्पष्टपणे दिसतात. त्यांची त्वचा कोमल असते आणि शरीराची ठेवण मध्यम असते. या राशीच्या व्यक्तींच्या हास्यामध्ये एक प्रकारची सात्विकता आणि माया असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात.
advertisement
स्वभाव आणि वैशिष्ट्ये
अत्यंत संवेदनशील: कर्क राशीचे लोक मनाचे खूप हळवे असतात. कोणाचेही दुःख त्यांना सहन होत नाही.
कल्पनाशक्तीचा राजा: चंद्राचा प्रभाव असल्याने या व्यक्तींची कल्पनाशक्ती अफाट असते. हे लोक उत्तम स्वप्नद्रष्टे असतात.
कौटुंबिक ओढ: यांच्यासाठी कुटुंब हेच सर्वस्व असते. आपल्या माणसांच्या सुखासाठी हे लोक स्वतःच्या आनंदाचा त्याग करायलाही मागे-पुढे पाहत नाहीत.
संशयी आणि मूडी: चंद्राच्या स्थितीनुसार यांचे विचार बदलतात. कधी हे अत्यंत आनंदी असतात, तर कधी विनाकारण उदास होतात. त्यांना जुन्या आठवणीत रमायला खूप आवडते.
करिअर आणि आर्थिक स्थिती
या राशीचे लोक उत्तम डॉक्टर, परिचारिका, हॉटेल मॅनेजमेंट, अध्यापन, समाजसेवा किंवा कला क्षेत्रात नाव कमावतात. जलक्षेत्राशी संबंधित व्यवसाय यांना खूप लाभ देतात. हे लोक पैसा साठवण्यात माहीर असतात. भविष्यातील तरतूद म्हणून ते जमीन किंवा सोन्यात गुंतवणूक करायला प्राधान्य देतात. मात्र, कोणालाही पैसे उधार देताना त्यांनी सावध राहावे.
आरोग्य
या व्यक्तींना पचनाचे विकार, गॅस, कफ आणि मानसिक तणावाचा वारंवार त्रास होऊ शकतो. या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. या लोकांनी रात्रीचे दही किंवा थंड पदार्थ खाणे टाळावे. भरपूर पाणी पिणे आणि चंद्राच्या प्रकाशात बसणे त्यांच्या आरोग्यासाठी हिताचे असते.
राहणीमान आणि आवडीनिवडी
कर्क राशीच्या व्यक्तींना घर सजवायला खूप आवडते. त्यांचे घर नेहमी नीटनेटके आणि पाहुणचाराने भरलेले असते. यांना समुद्राच्या किंवा नदीच्या काठी फिरायला आवडते. पांढरा, चंदेरी आणि फिकट निळा रंग यांच्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
