लाफिंग बुद्धा - दिवाळीच्या वेळी घरात लाफिंग बुद्धा आणल्यास घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. तुम्ही दिवाळीला लाफिंग बुद्धा घरात आणत असाल, तर त्याला मुख्य दरवाजाच्या समोर, घराच्या आतल्या बाजूला तोंड करून ठेवा. याव्यतिरिक्त, त्याला पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशेला (उत्तर-पूर्व) ठेवू शकता. घराव्यतिरिक्त, लाफिंग बुद्धाला ऑफिसच्या डेस्कवर देखील ठेवणे चांगले मानले जाते.
advertisement
तुळशीचे रोप - दिवाळीच्या काळात घरात तुळशीचे रोप लावून त्याची पूजा केल्यास सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते. यामुळे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होऊन तिची कृपा तुमच्यावर करेल. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप घराच्या ईशान्य कोपऱ्यात (उत्तर-पूर्व) ठेवावे. या दिशेमध्ये लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
श्रीफळ (नारळ) खरेदी करणे शुभ - दिवाळीपूर्वी घरात नारळ खरेदी करून आणल्यास समजावे की, माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झाली आहे. माता लक्ष्मीला नारळ अतिशय प्रिय आहे, नारळ पूजाघरात ठेवल्यास घरात सकारात्मकता वाढते.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं
कासव घरात आणेल समृद्धी - वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीला धातूचे (Metal) कासव घरात आणल्यास घरात सकारात्मक ऊर्जा तर येईलच, पण घरात शांतता, सुख आणि समृद्धी देखील येईल. धातूचे कासव उत्तर दिशेला आणि क्रिस्टलचे कासव ईशान्य दिशेला (उत्तर-पूर्व) ठेवावे. याव्यतिरिक्त, पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजावर घराच्या आतल्या बाजूला तोंड करून ठेवणे देखील शुभ आहे.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)