दीड दिवसांच्या गणपतीची उत्तरपूजा -
गणपती विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करणे ही एक महत्त्वाची परंपरा आहे. यामध्ये गणपतीला निरोप देण्यासाठी काही विशिष्ट विधी केले जातात, ज्यामुळे बाप्पाची आपल्यावर कृपादृष्टी कायम राहते.
मूर्ती विसर्जित करण्यापूर्वी चौरंग किंवा पाटावरील मांडणी स्वच्छ करावी. मूर्तीची जागा स्वच्छ पुसून घ्यावी. जर तुम्ही घरातच विसर्जन करणार असाल, तर एका मोठ्या बादलीत किंवा टबमध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवा.
advertisement
उत्तरपूजा करताना पंचोपचार पूजा करावी, म्हणजे गणपतीला हळद, कुंकू, अक्षता, चंदन आणि फुले अर्पण करून पुन्हा एकदा पूजा करावी. गणपतीला आवडता नैवेद्य (उदा. मोदक, लाडू) पुन्हा एकदा अर्पण करावा. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन गणपतीची आरती करावी. हात जोडून गणपतीला सांगावे की तुम्ही दोन दिवसांसाठी (दीड दिवसांसाठी) आमच्या घरी आला होता, त्यामुळे आम्ही कृतज्ञ आहोत. आमच्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करावी. आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम ठेवा. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणपतीला निरोप द्यावा.
जास्त नाही फक्त 4 दिवस वाट बघा! 3 राशींचा भाग्योदय जवळ आलाय, त्रिग्रही योग लकी
विसर्जन कसं करावं - आधी मूर्तीची थोडी जागा बदला, म्हणजे ती चौरंगावरून थोडी हलवावी. याचा अर्थ बाप्पाने विसर्जनासाठी जागा सोडली असा होतो. त्यानंतर मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जावे. शक्य असल्यास पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मातीची मूर्ती वापरा आणि ती कृत्रिम तलावात विसर्जन करावे. विसर्जन करून घरी परत येताना रिकाम्या हाताने येऊ नये. नदी किंवा तलावातील थोडे पाणी सोबत आणावे. हे पाणी घरात शिंपडल्यानं पवित्रता येते, असे मानले जाते. ही सर्व उत्तरपूजा आणि विधी केल्याने बाप्पाला आनंद मिळतो आणि ते तुमच्यावर कायम प्रसन्न राहतात.
घरात पूजेसाठी गणेश मूर्ती खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)