जून महिन्यात गजलक्ष्मी राजयोग कधी निर्माण होईल?
पंचांगानुसार, सध्या देवांचे गुरु बृहस्पती मिथुन राशीत भ्रमण करत आहेत. ते 2 जून 2026, मंगळवारी पहाटे 02 वाजून 25 मिनिटांनी चंद्राच्या मालकीच्या कर्क राशीत प्रवेश करतील. गुरु देव 31 ऑक्टोबर 2026, शनिवारपर्यंत दुपारी 12 वाजून 50 मिनिटांपर्यंत याच राशीत राहतील. दुसरीकडे, भौतिक सुख-सुविधांचा कारक ग्रह शुक्र सध्या मकर राशीत आहे, परंतु तो 8 जून 2026, सोमवारी सायंकाळी 05 वाजून 47 मिनिटांनी कर्क राशीत गोचर करेल. शुक्र देव 4 जुलै 2026, शनिवारपर्यंत सायंकाळी 07 वाजून 18 मिनिटांपर्यंत कर्क राशीत राहतील.
advertisement
यानुसार, 8 जून रोजी सायंकाळी 05 वाजून 47 मिनिटांपासून कर्क राशीत गुरु आणि शुक्राची युती होईल, ज्यातून गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती होईल. हा राजयोग 8 जून 2026 पासून 4 जुलै 2026 पर्यंत अस्तित्वात असेल. शुक्राचे कर्क राशीतून निर्गमन होताच हा योग समाप्त होईल.
घराच्या आत कधीही असू नयेत अशा 5 गोष्टी; सुख-शांती नांदूच शकत नाही, धनहानी
गजलक्ष्मी राजयोगाचे लाभ - गजलक्ष्मी राजयोगामध्ये गुरु अफाट ज्ञान आणि बुद्धी देतात, तर शुक्र सुख-विलास प्रदान करतात. गजलक्ष्मी राजयोग तयार होतो, तेव्हा व्यक्तीला अचानक धनलाभ होतो आणि ती आर्थिक संकटातून बाहेर पडते. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्यात यश मिळते.
ज्यांच्या राशीत हा योग तयार होतो, त्यांच्या आयुष्यात भौतिक सुख-सुविधांची वाढ होते. घर, गाडी यांसारखी सुखे मिळतात आणि व्यक्ती राजासारखे जीवन व्यतीत करते. गजलक्ष्मी राजयोगाच्या काळात केलेल्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळतो. वडिलोपार्जित संपत्ती, शेअर बाजार, लॉटरी इत्यादी माध्यमातून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
पुन्हा अभद्र घडणार! 13 फेब्रुवारीला सूर्य-राहुचा ग्रहण योग अनलकी, 3 राशींना धोका
कार्यक्षेत्रात मान-सन्मान आणि प्रभाव वाढतो. नवीन जबाबदारी मिळणे, पदोन्नती किंवा नवीन नोकरीचे योग जुळून येतात. सरकार आणि प्रशासनाकडून सहकार्य लाभते. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे वैवाहिक जीवन सुखमय होते. प्रेमसंबंधांसाठी हा काळ उत्तम असतो. आयुष्यात रोमान्स वाढतो आणि व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनते.
