आशियातील सर्वात उंच शिव मंदिर - हिमाचलच्या सोलन जिल्ह्यात असलेले शिव मंदिर बांधण्यासाठी 39 वर्षे लागली. या शिव मंदिराची विविध रहस्य कथा सांगिकतल्या जातात. विशेष म्हणजे या शिव मंदिराला आशियातील सर्वात उंच शिव मंदिर म्हटले जाते. जटोली शिव मंदिर या नावानं हे मंदिर प्रसिद्ध आहे.
मंदिराच्या दगडांमधून डमरूचा आवाज - या शिवमंदिरातील भिंतीच्या दगडांवर हातानं जोरात थाप मारल्यास त्यातून डमरूचा आवाज येतो. स्वामी कृष्णानंद परमहंस यांनी हे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. १९५० मध्ये त्यांनी सोलनच्या या दुर्गम टेकड्यांवर शिवमंदिर बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर सुमारे ३९ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु त्याच्या फक्त ६ वर्षांपूर्वी १९८३ मध्ये स्वामीजींचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी स्वामीजींच्या अपूर्ण स्वप्नांना आकार दिला आणि या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
advertisement
हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलं गेलं आहे, उंच शिखरावर एक सोन्याचा कलश आहे. हे १११ फूट उंच मंदिर सोलनमधील पर्वताच्या दुर्गम आणि सर्वात उंच शिखरावर उभं आहे, ते आशियातील सर्वात उंच मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधले गेले आहे, ते उत्तर आणि दक्षिणेचे एकीकरण दर्शवते. शिखरावरील सोन्याचा कलश आहे, या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो.
भव्य शिवलिंग स्फटिकापासून बनलेले - या मंदिराच्या आत महादेवाचे भव्य आणि विशाल शिवलिंग असून ते स्फटिक रत्नापासून बनलेले आहे. स्वामी कृष्णानंद यांची समाधी देखील त्याच्या शेजारी आहे. ज्या ठिकाणी हे मंदिर बांधले आहे त्या ठिकाणाबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते की, साक्षात शंकर येथे आले होते आणि त्यांनी काही काळ येथे वास्तव्य केलं होतं. या मंदिरातील प्राचीन शिवलिंग देखील बराच काळ स्थापित आहे.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
या मंदिराला महादेवाच्या जटांवरून जटोली हे नाव पडलं आहे - असं मानलं जातं की हे मंदिर पूर्वी भगवान महादेवाचे विश्रांतीस्थान होते. महादेवाच्या लांब जटांमुळे जटोली शिवमंदिर असे नाव पडले आहे. इतक्या उंच टेकडीवर मंदिर असूनही ईशान्य कोपऱ्यात 'जल कुंड' आहे, त्यातील पाणी गंगे इतकेच पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की या तलावाच्या पाण्यात काही औषधी गुणधर्म आहेत जे त्वचारोग बरे करू शकतात.
दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार
या पाण्याच्या तळ्याबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा स्वामी कृष्णानंद परमहंस येथे आले तेव्हा त्यांनी पाहिले की सोलनमधील लोक पाण्यासाठी वणवण करत आहेत. त्यावेळी त्यांनी महादेवाची कठोर तपस्या केली आणि त्यानंतर या पाण्याच्या तळ्याची उत्पत्ती येथे झाली. तेव्हापासून या भागात कधीही पाण्याची कमतरता भासलेली नाही. जटोली शिवमंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ते त्वरित पर्यटकांसाठी उघडण्यात आले नव्हते, त्यानंतर २०१३ मध्ये ते शिवभक्तांसाठी उघडण्यात आले.