सतना, 10 नोव्हेंबर : दिवाळीला सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज धनत्रयोदशी आहे. आजच्या दिवशी माता लक्ष्मी, गणेश आणि भगवान धन्वंतरि यांची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन बाहेर पडले, त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
यादिवशी विविध गोष्टी खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात त्यामध्ये एक म्हणजे मीठ. मीठ खरेदी करणे हे खूप शुभ आहे. यामुळे रोग आणि गरिबी दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते. यामुळे वर्षभर धनप्राप्ती मिळते.
मीठाने करा हे 5 उपाय -
1. लक्ष्मीचे होईल आगमन : पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरी माता लक्ष्मीचे आगमन होते. यामुळे घरात धनसमृद्धीमध्ये वाढ होते.
2. घरातील दरिद्रता दूर करा : धनत्रयोदशीच्या दिवशी काचेची वाटीत मीठ घेऊन घरातील ईशान्य कोणात ठेवा. यामुळे घरात समृद्धता येते आणि घरातील दरिद्रतेचा नाश होतो. लक्ष्मी मातेची कृपा होते. घरातील दरिद्रतेला दूर करण्यासाठी हा अचूक उपाय आहे.
3. घरात मीठाने साफसफाई करा : वास्तु शास्त्रानुसार, धनत्रयोदशीला पाण्यात मीठ टाकून पोछा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर जाते. घरात सुख समृद्धी येते. घरातील वाद संपतात.
4. नाते होतात मधुर : नवविवाहित पती-पत्नीमध्ये मतभेद असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी काचेच्या भांड्यात मिठाचा तुकडा ठेवल्यास ते मतभेद दूर होतात. दोघांमध्ये प्रेम निर्माण होते.
5. वाईट नजरेपासून करते मीठ रक्षण : असे म्हणतात की, ज्या मुलांच्या वारंवार नजर होत असेल त्यांच्या डोक्यावर मीठ चोळल्याने मुलांमधील आणि घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जातात. जर घरात लहान मूल असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा.
(सूचना: या बातमीत दिलेली माहिती मान्यतांवर आधारित आहे. न्यूज18 याबाबत कोणताही दावा करत नाही)