माघी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व - या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केली जाते. काही ठिकाणी भाविक या दिवशी व्रत करून सत्यनारायणाची पूजा करतात, ते व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. माघी पौर्णिमेला गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. खासकरून नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने सूर्य आणि चंद्राशी संबंधित दोषांपासून मुक्ती मिळते, म्हणूनच या दिवसाला पुण्य योग असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णू स्वतः प्रयागमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि तिथे आलेल्या भक्तांची सर्व संकटे दूर करतात. स्नानाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायी मानले जाते.
advertisement
दानधर्माचे महत्त्व - हिंदू पंचांगातील 11 व्या महिन्यात म्हणजेच माघ महिन्यात दानाला खूप महत्त्व आहे. माघी पौर्णिमेला तिळाचे दान करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. याशिवाय वस्त्र, अन्न, गूळ, कापूस, तूप, लाडू आणि फळांचे दानही केले जाते. मत्स्य पुराणानुसार, जो व्यक्ती माघी पौर्णिमेच्या शुभ दिवशी ब्राह्मणांना आणि गरजूंना दान करतो, त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो. या दिवशी केलेले दान पुण्य वाढवण्यासोबतच कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासही मदत करते.
पूर्वमुखी घर का सर्वात शुभ? पण 'वास्तु'चे हे नियम 90% लोक दुर्लक्षित करून चुकतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
