महामृत्युंजय मंत्र
ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
लघु मृत्युंजय मंत्र
ओम जूं स माम् पालय पालय स: जूं ओम.
महामृत्युंजय जप करण्याचे फायदे -
1. शारीरिक आरोग्य चांगलं राहतं, व्यक्तिला दीर्घायुष्य मिळतं. या मंत्राचा नियमित जप केल्यानं गंभीर आणि जुनाट आजारांपासून मुक्ती मिळते. महामृत्युंजय मंत्र एक प्रकारचे संरक्षक कवच म्हणून काम करतो. त्यामुळे अकाली मृत्यूचे भय कमी होते आणि व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
2. मानसिक शांती आणि स्थिरता - तणाव कमी होतो, दररोज जप केल्याने मानसिक तणाव, चिंता आणि भीती कमी होते. मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता वाढते.
3. घरामध्ये किंवा आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती आणि वाईट ऊर्जा दूर होते. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रहदोष, विशेषतः शनि आणि मंगळ यांसारख्या ग्रहांमुळे होणारे अशुभ परिणाम या मंत्राच्या प्रभावाने कमी होतात. हा मंत्र केवळ भौतिक सुखांसाठी नाही, तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही महत्त्वपूर्ण आहे. यामुळे आत्मज्ञान आणि मोक्षाच्या दिशेने प्रगती होते.
4. धन आणि समृद्धी - आर्थिक अडथळे दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते. कोणत्याही महत्त्वाच्या कामात किंवा नवीन सुरू होणाऱ्या कामात यश मिळवण्यासाठी या मंत्राचा जप करणे लाभदायक मानले जाते.
हातून नकळत घडलेल्या या गोष्टींमुळे पूर्वज अतृप्त राहतात; पितृदोष कुटुंबाला छळतो
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)