या वर्षी ९ ऑगस्ट २०२५ (शनिवार) रोजी रक्षाबंधन आहे. राखी बांधण्यासाठी कोणताही भद्रकाल नसून, पहाटेपासून दुपारपर्यंत शुभ मुहूर्त आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ५:३५ पासून दुपारी १:२४ पर्यंत आहे. ब्रह्म मुहूर्त: पहाटे ४:२२ ते ५:०४ या वेळेत राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते.
रक्षाबंधन दिवशी बहिणीने सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. एका पूजा ताटात राखी, कुंकू, अक्षता, मिठाई, निरांजन आणि पाणी ठेवावे. भावाला पाटावर बसवून बहिणीने त्याच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावून त्याचे औक्षण करावे. त्यानंतर बहिणीने भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना, भाऊ दीर्घायुषी होवो आणि त्याचे रक्षण होवो अशी प्रार्थना करावी. राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू किंवा पैसे देतो. त्यानंतर दोघेही एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करतात.
advertisement
यंदाच्या रक्षाबंधनला भद्रकाळ नाही! राखी बांधण्याचा अचूक शुभ मुहूर्त जाणून घ्या
ओवाळणीच्या ताटात खालील गोष्टी असाव्यात:
ताटातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखी. ती एका सुंदर वाटीत किंवा भांड्यात ठेवावी. भावाच्या कपाळावर टिळा लावण्यासाठी कुंकू आणि अक्षता (अखंड तांदूळ) ठेवावे. कुंकू हे सौभाग्याचे आणि अक्षता हे कल्याणाचे प्रतीक मानले जाते. आरती करण्यासाठी तुपाचे किंवा तेलाचे निरांजन किंवा दिवा लावावा. दिवा हे सकारात्मकता आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी पेढे, लाडू किंवा इतर कोणत्याही प्रकारची मिठाई ठेवावी. एका छोट्या वाटीत पाणी ठेवावे. पूजेचे वातावरण पवित्र करण्यासाठी अगरबत्ती किंवा उदबत्ती लावावी.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)