जीवनावर पडतो प्रभाव - अनेक लोक आपल्या फोनच्या स्क्रीनवर देवाचा फोटो लावतात. काही लोक मंदिर-मशीद यांसारख्या धार्मिक स्थळांचे फोटोही ठेवतात. फोनच्या वॉलपेपरवर देवाचे किंवा धार्मिक स्थळांचे फोटो ठेवणे चांगले असते का? जर तुमच्या फोनच्या वॉलपेपरवरही देवी-देवतांचे फोटो असतील, तर त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो? ज्योतिषांच्या मते, वॉलपेपर फक्त फोनवर लावलेला एक फोटो नसतो तर तो आपलं व्यक्तिमत्व आणि मानसिक स्थिती देखील दर्शवतो. आपण निवडलेल्या वॉलपेपरचा आपल्या जीवनावर अनेकदा परिणाम होतो.
advertisement
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनच्या वॉलपेपरवर देवाचा फोटो लावणे चांगले मानले जात नाही, ते अशुभ असते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, मोबाईल फोनचा वापर सर्वत्र होतो, जसे की बाथरूममध्ये, रस्त्यावर किंवा कधीकधी अशुद्ध ठिकाणी देखील. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये देवी-देवतांचा फोटो किंवा धार्मिक स्थळांचे फोटो ठेवणे शुभ मानले जात नाही. मोबाईल फोनवर येणाऱ्या नोटिफिकेशन्स, कॉल आणि इतर सांसारिक गोष्टींच्या दरम्यान धार्मिक स्थळांचे फोटो ठेवणे अयोग्य मानले जाते. वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे फोटोंबद्दल आदर आणि सन्मान राखला जात नाही.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं
ग्रहांचाही पडतो प्रभाव - कधीकधी आपण घाणेरड्या हातांनीच फोन घेतो किंवा अनेक लोक फोन हातात धरून जेवणही करतात. असे केल्याने देवी-देवतांचा आणि धार्मिक स्थळांचा अपमान होतो. वास्तुशास्त्रामध्येही मोबाईल फोनवर देवी-देवतांचे फोटो लावणे अशुभ मानले गेले आहे. ग्रहांच्या प्रभावामुळे जीवनात अशुभ परिणाम मिळू शकतात.
मोबाईल वॉलपेपरबाबत - अनेक लोक आपल्या फोनमध्ये देवी-देवतांव्यतिरिक्त भावनांशी (इमोशन) जोडलेले वॉलपेपर लावतात, ते तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करतात. अशा प्रकारचे वॉलपेपर लावल्यानं नकारात्मकता आणि जीवनात अनेक प्रकारच्या समस्या वाढतात, त्यामुळे असे वॉलपेपर लावणं टाळायला हवं. गडद रंगाचे वॉलपेपर देखील मोबाईल स्क्रीनवर लावणे टाळावे.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)