आज मनातलं व्यक्त करण्यासाठी नवीन मार्ग शोधाल. हा दिवस तुमची शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणारा ठरेल, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. परदेशातून येणारे पैसे आज सहज मिळतील. प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस फारसा उत्साही नाही, त्यामुळे संध्याकाळी काहीतरी रंजक करण्याचा प्रयत्न करा. तुमचा भाग्यवान अंक 15 असून भाग्यवान रंग लाल आहे.
मूलांक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेले लोक)
advertisement
आज वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात काही अडचणी आणू शकतात. असे असले तरी तुम्ही समाधानी असाल आणि दिवस यशस्वी असेल. तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या. स्पर्धक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर द्याल. जोडीदारासोबत गंभीर वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना काळजी घ्या. तुमचा भाग्यवान अंक 17 असून भाग्यवान रंग पोपटी हिरवा आहे.
मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेले लोक)
काळानुसार तुमचे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण होतील. लांबून आलेल्या एखाद्या बातमीमुळे तुम्हाला आनंद आणि आर्थिक लाभ होईल. परदेशाशी संबंधित भागीदारी किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आज पदरी निराशा येऊ शकते. अशा गोष्टी अधिक चांगल्या काळासाठी पुढे ढकलणे योग्य ठरेल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता असल्याने शांत राहणे हिताचे आहे. तुमचा भाग्यवान अंक 7 असून भाग्यवान रंग पीच आहे.
मूलांक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
उच्च अधिकाऱ्यांशी संबंधित प्रकल्प प्रशासकीय कचाट्यात अडकू शकतात. आज तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात याल. दीर्घकाळ चाललेल्या तणावानंतर आज तुम्हाला उत्साही वाटेल आणि तुमचे आकर्षण वाढेल. तुम्ही ठरवलेली ध्येये आज सहज पूर्ण होतील. जोडीदारासोबतचे संबंध तणावाचे असू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. तुमचा भाग्यवान अंक 7 असून भाग्यवान रंग मरून आहे.
'या' तारखांचा जन्म असणारे सर्वांना हवे-हवे वाटतात; कामातूनच आपला करिष्मा दाखवतात
मूलांक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)
आज मित्रांकडून तुमचे कौतुक होईल. धावपळीमुळे तुम्हाला दिवसभर थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकतो. कोणाचीही मदत स्वीकारताना सावध राहा, कारण आज फसवणुकीची दाट शक्यता आहे. मालमत्तेच्या व्यवहारातून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस अतिशय सकारात्मक आहे. तुमचा भाग्यवान अंक 11 असून भाग्यवान रंग लिंबू पिवळा आहे.
मूलांक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेले लोक)
घरातील किरकोळ वाद विकोपाला जाऊ शकतात, त्यामुळे नको असलेल्या चर्चा टाळा. तुम्हाला फ्लू किंवा तापाचा त्रास जाणवू शकतो, आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायाला मनोरंजनाची जोड देणे तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही हलक्या-फुलक्या फ्लर्टिंगच्या मूडमध्ये असाल, पण मर्यादा पाळा. तुमचा भाग्यवान अंक 1 असून भाग्यवान रंग फिकट पिवळा आहे.
मूलांक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)
आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाभ मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. तुमची ओळख प्रभावशाली व्यक्तींशी होईल. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात, त्यामुळे हलका आहार घ्या. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. आज कोणीतरी खास व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी चांगले करेल. तुमचा भाग्यवान अंक 18 असून भाग्यवान रंग लाल आहे.
मूलांक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक)
घरगुती आघाडीवर सर्व काही सुरळीत राहील. तुमचे नातेसंबंध काळानुसार अधिक घट्ट होतील. चैनीच्या वस्तू मिळवण्याची इच्छा प्रबळ राहील. तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा शिखरावर असेल, ज्यामुळे तुम्हाला खूप शक्तिशाली वाटेल. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे समृद्धीचे दरवाजे उघडतील. जोडीदारासोबत आजची संध्याकाळ सुखद जाईल. तुमचा भाग्यवान अंक 7 असून भाग्यवान रंग चंदेरी आहे.
मकर मेषसह 6 राशींना दुप्पट फायदा; फेब्रुवारीत शनिच्या राशीत 4 ग्रह जमल्याचा लाभ
मूलांक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)
आज भावंडांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा आणि दिलासा मिळेल. तुमचे वैयक्तिक आकर्षण वाढेल. कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि आहारात फळे व भाज्यांचा समावेश करा. आंतरराष्ट्रीय व्यापारात आज मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात; सुखी राहायचे असेल तर एकमेकांवर वर्चस्व गाजवणे थांबवा. तुमचा भाग्यवान अंक 3 असून भाग्यवान रंग क्रीम आहे.
