आज शुक्रवारी चांगला वेळ मिळेल तो मित्रांसमवेत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मुलांकडून आज आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. शारीरिकदृष्ट्या उत्तम वाटत आहे. आरोग्यासाठी नवा फिटनेस कार्यक्रम सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे. जोडीदाराच्या आरोग्यामुळे काही चिंतेचे प्रसंग येतील.
Lucky Number : 6
Lucky Colour : Black
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आज काही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मुलं शाळेतून चांगली बातमी आणतील. तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उच्च पातळीवर असेल. त्यामुळे शक्तिशाली असल्यासारखं वाटेल. रोमँटिक मेमरीज तयार करण्याचा काळ आहे. जोडीदारासह खास क्षण व्यतीत कराल.
Lucky Number : 22
Lucky Colour : Red
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
शुक्रवारचा दिवस कामांसाठी चांगला आहे. तुम्हाला आयुष्यात उत्तम गोष्टी असाव्यात असं वाटेल. चिकाटीने प्रयत्न करण्याचं नियोजन करा, सगळं सत्यात येईल. आरोग्याकडे लक्ष द्या. उच्चपदस्थ व्यक्तींचं मन लवकर वळवता येऊ शकेल. अर्थात खूप कष्ट घ्यावे लागू शकतात.
Lucky Number : 5
Lucky Colour : Grey
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
शुक्रवारी अनेक कामे होतील, सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यामुळे खूप समाधान मिळेल. प्रॉपर्टी खरेदी करण्याला अंतिम रूप देण्यासाठी चांगला काळ आहे. स्टॉक मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे. रिलेशनशिपवर ताण असेल. जोडीदारासाठी वेळ काढा.
Lucky Number : 17
Lucky Colour : White
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
शुक्रवारी अनपेक्षित काही गोष्टी जुळून येतील, नव्या मैत्रीचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांतला कटू अनुभव हळूहळू पुसला जाईल. त्वचेची समस्या उद्भवल्यास चांगल्या स्पेशालिस्टचा सल्ला घ्या. नव्या व्यक्तीशी भेट होईल. हृदय देण्यापूर्वी त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्या.
Lucky Number : 15
Lucky Colour : Brown
देवी दुर्गेची 9 रुपं आणि नऊ रंग..! नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
शुक्रवारचा दिवस कदाचित भाग्याचा असेल, सरकारी कार्यालयात प्रलंबित असलेले काम अनुकूल अशा पद्धतीने मंजूर होईल. अनपेक्षित मतभेदांमुळे तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे का होत आहे? प्रॉपर्टीचा व्यवहार या वेळी तोट्याचा ठरेल. फॉरीनर्स आणि परदेशातून आकर्षक बिझनेस संधी मिळतील.
Lucky Number : 9
Lucky Colour : Yellow
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
शुक्रवारी कामांना प्राधान्य द्या तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींमध्ये अति गुंतणं टाळा. दिवसभर एक असमाधानाची भावना राहील. पोटाची समस्या राहील. काय खाताय यावर लक्ष ठेवा. प्रमोशन किंवा चांगलं बिझनेस प्रपोझल येऊ शकेल. एखाद्या व्यक्तीकडे अधिकाधिक आकर्षित होत असल्यासारखं वाटेल.
Lucky Number : 22
Lucky Colour : Blue
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजपासून शाकाहारी होण्याचा गांभीर्यानं विचार कराल. नाहक वादांमध्ये आज अडकून वेळ वाया घालवू नका. तीव्र डोकेदुखीची शक्यता आहे, रिलॅक्स व्हा. नव्या बिझनेस संधी येतील. रोमान्सच्या शक्यता या काळात उज्ज्वल आहेत.
Lucky Number : 4
Lucky Colour : Purple
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बरीच कामं आज मार्गी लागतील, सरकारी काम यशस्वीरीत्या संपेल. आज बाहेर खावेसे वाटेल, सावध राहा. कोणतीही जखम बरं होण्यास काही काळ लागेल. उत्पन्न वाढेल; पण अपेक्षाही वाढतील. जोडीदाराशी वेव्हलेंग्थ जुळेल. त्याचा जास्त फायदा करून घ्या.
Lucky Number : 15
Lucky Colour : Green
घटस्थापनेपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)