सफला एकादशी कधी आहे?
सफला एकादशी तिथी 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:49 वाजता सुरू होत असून ही तिथी 15 डिसेंबर रोजी रात्री 9:19 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, या वर्षी सफला एकादशीचे उपवास आणि पूजा 15 डिसेंबर रोजी करणे योग्य ठरेल.
सफला एकादशीला श्रीहरींची पूजन विधी -
सफला एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी भगवान विष्णूंची पूजा करा. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा किंवा गोपी चंदनाचा टिळा लावा. श्रीहरींना पंचामृत, ताजी-हंगामी फळे अर्पण करा. देवाला तुळशीची पाने अर्पण करण्यास विसरू नका. थंडीचा काळ असल्यानं दान म्हणून या दिवशी स्वेटर-ब्लँकेट अशा गोष्टी आणि अन्नदान करण्याचे विशेष फळ मिळते.
advertisement
सफला एकादशीचे उपाय
1. उत्तम आरोग्यासाठी
चांगल्या आरोग्यासाठी श्रीहरींना हंगामी फळे अर्पण करा, 108 वेळा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा. ही फळे प्रसाद म्हणून ग्रहण करा. या प्रसादाने रोगी व्यक्तीही आरोग्य लाभ मिळवू शकते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आयुष्य, आरोग्य आणि वैभवाचा आशीर्वाद मिळतो.
डिसेंबरच्या शेवटी वारं फिरतंय! बाबा वेंगांच्या मते 4 राशी अनपेक्षित मालामाल
2. धन-संपत्तीच्या प्राप्तीसाठी
आर्थिक अडचणींमध्ये अडकलेल्या लोकांनी दररोज सकाळी पाण्यात लाल फूल टाकून सूर्य देवाला अर्पण करा. सायंकाळी पूजास्थानी तुपाचा चारमुखी दिवा लावा. असे केल्याने आर्थिक कार्य लवकर पूर्ण होतात, असे मानले जाते.
3. कुटुंबाच्या रक्षणासाठी
श्रीहरींना रेशमाचा पिवळा धागा अर्पण करा. त्यानंतर हा धागा हातात घेऊन 108 वेळा ‘रां रामाय नमः’ मंत्राचा जप करा. यानंतर पुरुषांनी हा धागा आपल्या उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात बांधावा. हा उपाय कुटुंबाचे संरक्षण आणि एकता वाढवण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे.
साडेसाती असो की अडीचकी..! शनिदोषातून सुटका मिळवण्यासाठी ही फुले शनिला अर्पण करा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
