TRENDING:

ShaniPradosh: शनिवार त्रासातून सुटका करेल! शनिप्रदोष असल्यानं सायंकाळी करून घ्या या गोष्टी

Last Updated:

ShaniPradosh: शनिप्रदोष व्रत हे भगवान शिव आणि शनिदेव यांना समर्पित आहे. हे व्रत शनिवारी त्रयोदशी तिथीला येते, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. यासोबतच शनिदेवाची पूजा केल्यानं त्यांचे आशीर्वाद मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रदोष व्रत वाराच्या नावावरून ओळखले जाते. प्रदोषादिवशी असलेल्या वाराचे नाव त्या व्रताला दिले जाते. आज शनिवारी शनिप्रदोष असून शनिप्रदोष व्रत हे भगवान शिव आणि शनिदेव यांना समर्पित आहे. हे व्रत शनिवारी त्रयोदशी तिथीला येते, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. यासोबतच शनिदेवाची पूजा केल्यानं त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि साडेसाती-अडीचकी यांसारख्या ग्रहस्थितींमुळे होणारे त्रास कमी होतात, असे मानले जाते.
News18
News18
advertisement

धार्मिक महत्त्व - हिंदू धर्मात शनिप्रदोष व्रताचे धार्मिक महत्त्व आहे: या दिवशी शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. व्रत ठेवणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शनिप्रदोषी पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. यामुळे, ज्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती प्रतिकूल आहे त्यांना शनीच्या कोपामुळे होणारे त्रास कमी होतात. संतती नसलेल्या दाम्पत्यांसाठी हे व्रत खूप फलदायी मानले जाते.

advertisement

कोणत्या राशींना लाभ होईल? -ज्योतिषशास्त्रानुसार, शनिप्रदोषी शनिदेवाची पूजा केल्यानं काही राशींना विशेष लाभ होऊ शकतो. या राशींमध्ये मिथुन, तूळ, धनु, मकर आणि कुंभ या राशींचा समावेश होतो.

कुंभ, मीन, मेष या राशींवर सध्या साडेसाती सुरू आहे. या राशींच्या व्यक्तींनी शनिप्रदोष व्रत ठेवल्यास त्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रासांपासून दिलासा मिळू शकतो. 

advertisement

सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दु:खाचे दिवस! राहु-चंद्र युतीमुळे या राशींवर ग्रहण

शनिप्रदोषी काय करावे? - शनिप्रदोषी प्रदोष काळात (सूर्यास्ताच्या वेळेस) भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक करावा. यासोबतच शनिदेवाच्या मूर्तीची पूजा करावी आणि 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा. शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा अभिषेक करणे आणि काळे तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. 

advertisement

संध्याकाळी प्रदोष काळात पूजा -

संध्याकाळी पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावे. पूजास्थळ स्वच्छ करून भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, भांग, पांढरी फुले, चंदन, अक्षत (तांदूळ) अर्पण करावे. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर) यांनी शिवलिंगाचा अभिषेक करावा. भगवान शिवाला नैवेद्य (खीर किंवा कोणताही सात्विक पदार्थ) अर्पण करावा. 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. त्यानंतर, शनिदेवाची पूजा करावी. त्यांना मोहरीचे तेल, काळे तीळ आणि काळे वस्त्र अर्पण करावे. 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा. शनिप्रदोष व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. शेवटी, शिव आणि शनिदेवाची आरती करावी. 

advertisement

उद्यापासून पुन्हा दम'धार'! सासवा गेल्या आता सूनांचा पाऊस; वाहन म्हैस असल्यानं...

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
ShaniPradosh: शनिवार त्रासातून सुटका करेल! शनिप्रदोष असल्यानं सायंकाळी करून घ्या या गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल