नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास -
जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील शनि पर्वत पूर्णपणे स्पष्ट आणि नीट ओळखून येत असेल तर असे लोक खूप भाग्यवान असतात. हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. हे लोक जे ठरवतात ते साध्य करेपर्यंत विश्रांती घेत नाहीत. हे लोक कठोर परिश्रम करतात आणि प्रचंड संपत्ती कमावतात. तसेच, ते कामात आळस दाखवत नाहीत.
advertisement
शनी आणि बुध ग्रह स्पष्ट - शनि पर्वत आणि बुध पर्वत दोन्ही हातात पूर्णपणे स्पष्ट असतील तर असे लोक प्रचंड संपत्तीचे मालक बनतात. तसेच, हे लोक मोठे व्यापारी बनू शकतात. हे लोक व्यवसायात जोखीम पत्करून खूप पैसे कमवतात. तसेच, या लोकांना आयुष्यात खूप आदर मिळतो.
परोपकारी असतात - हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावरील शनि पर्वत गुरु पर्वताकडे झुकलेला असेल तर ते शुभ मानले जाते. अशा लोकांना समाजात खूप आदर मिळतो. समाजातील लोक त्यांना खूप श्रेष्ठ मानतात. तसेच, हे लोक इतरांना मदत करणारे असतात. हे लोक स्वभावाने खूप उदार असतात.
वयाच्या ३५ नंतर नशीब चमकतं?
ज्यांच्या हातावर ठळक शनि रेषा असते, त्यांना जगातील सर्व सुखसोयी मिळतात. तसेच, अशा लोकांचे नशीब ३५ वर्षांनंतर विशेष चमकते. करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तळहातामध्ये शनि रेषा चांगली असेल तर त्या व्यक्तीला सरकारी पदावर नोकरी मिळते.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)