किचनमध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते-
तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली भांडी - तुटलेली भांडी गरिबी आणि दुर्दैवाचे प्रतीक मानली जातात. अशा भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा वस्तू त्वरित घरातून काढून टाकाव्यात. वापरात नसलेली किंवा खराब झालेली भांडी ठेवू नयेत.
औषधे - किचनमध्ये औषधे ठेवल्याने कुटुंबातील लोकांचे आरोग्य वारंवार बिघडते. स्वयंपाकघरातील उष्णता आणि अग्नीमुळे औषधांचा प्रभाव कमी होतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. औषधे नेहमी स्वतंत्र कपाटात किंवा घरात इतरत्र ठेवावीत, जिथे ती सुरक्षित राहतील.
advertisement
झाडू - झाडू हा लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो, पण त्यानं आपण कचरा काढतो, स्वच्छता करतो. त्यामुळे स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो तिथे झाडू ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात धन-धान्याची कमतरता भासू शकते. झाडू स्वयंपाकघरात ठेवू नये, तो घरात इतरत्र बाहेरच्या लोकांची सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.
यंदाच्या रक्षाबंधनला भद्रकाळ नाही! राखी बांधण्याचा अचूक शुभ मुहूर्त जाणून घ्या
पाणी आणि अग्नी एकत्र - वास्तुशास्त्रानुसार, अग्नी आणि पाणी (पाण्याची टाकी, सिंक) हे परस्परविरोधी घटक आहेत. हे दोन्ही घटक एकत्र ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी गॅस शेगडी आणि सिंक यांच्यामध्ये काही अंतर असावे. शक्य नसल्यास त्यांच्यामध्ये लाकडी वस्तू किंवा फुलदाणी ठेवावी.
आरसा - स्वयंपाकघरात आरसा ठेवल्यास अग्नीचे प्रतिबिंब आरशात दिसते, ज्यामुळे अग्नीचा प्रभाव वाढतो आणि ते हानिकारक ठरू शकते. यामुळे घरातील लोकांच्या जीवनात अडचणी वाढतात. स्वयंपाकघरात आरसा लावणे पूर्णपणे टाळावे, असे सांगितले जाते. तसेच किचनमध्ये डस्टबिन उघडी ठेवू नये, शिळे अन्न जास्त काळ ठेवू नये आणि काटेरी रोपे स्वयंपाकघरात लावू नयेत. या सर्व गोष्टी दैनंदिन कामांमध्ये अडचणी निर्माण करू शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)