धनु रास - धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन सकारात्मक सिद्ध होऊ शकते. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून अकराव्या भावात (उत्पन्न आणि लाभाचे स्थान) भ्रमण करतील. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे तुम्ही धन कमवू शकता. धनाच्या जुन्या समस्यांपासूनही तुमची सुटका होईल. या वेळी तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ मिळेल. करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होऊ शकतात, ज्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल. व्यापारातही लाभाची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
advertisement
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन अनुकूल सिद्ध होऊ शकते. कारण सूर्य तुमच्या गोचर कुंडलीतून सुख आणि मालमत्तेच्या स्थानावरून भ्रमण करेल. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तुम्ही या दरम्यान वाहन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. सामाजिक कार्यात मान-प्रतिष्ठा वाढेल आणि तुमची प्रगती होईल. व्यवसायात नवीन संधी समोर येतील आणि तुमचा जुना थांबलेला प्रोजेक्ट आता वेग पकडू शकतो. कौटुंबिक जीवनात दीर्घकाळापासून सुरू असलेला कोणताही वाद मिटू शकेल. तसेच, या काळात तुमच्या आईसोबतचे संबंध अधिक चांगले होतील.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं
तूळ रास - सूर्यदेवाचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी सिद्ध होऊ शकते. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून लग्न भावात (पहिल्या भावात) भ्रमण करणार आहेत. तसेच, सूर्य देव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुम्हाला मान-सन्मानाची प्राप्ती होऊ शकते. तुमचे व्यावसायिक जीवन स्थिर होईल आणि प्रगतीची संधी मिळेल. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील. कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या लोकांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात. तसेच, अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)