TRENDING:

Blue Sapphire: अंगठीत धारण करावं निळ्या रंगाचं हे रत्न! 4 राशींना जबरदस्त लाभतं; शनिची ताकद दुप्पट

Last Updated:

Astrology: नीलम हे असेच एक शक्तिशाली रत्न आहे, जे शनि ग्रहाचा दोष कमी करून व्यक्तीच्या जीवनात स्थिरता, आत्मविश्वास आणि प्रगती आणते. रत्नशास्त्र जाणकारांच्या मते, शनीचे रत्न नीलम प्रत्येकाला अनुकूल ठरत नाही, त्यामुळे हे रत्न घालण्यापूर्वी त्यासंबंधीचे नियम...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांचे मुख्य कारण ग्रहांची स्थिती मानली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी रत्न धारण करण्याची परंपरा सांगितली आहे. परंतु रत्न तेव्हाच फलदायी ठरते जेव्हा ते योग्य वेळी, योग्य बोटात आणि योग्य पद्धतीने परिधान केले जाते. नीलम हे असेच एक शक्तिशाली रत्न आहे, जे शनि ग्रहाचा दोष कमी करून व्यक्तीच्या जीवनात स्थिरता, आत्मविश्वास आणि प्रगती आणते. रत्नशास्त्र जाणकारांच्या मते, शनीचे रत्न नीलम प्रत्येकाला अनुकूल ठरत नाही, त्यामुळे हे रत्न घालण्यापूर्वी त्यासंबंधीचे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शनीचे रत्न नीलम कोणत्या 4 राशींसाठी अनुकूल आणि फायदेशीर ठरते, हे जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

या 4 राशींसाठी नीलम आहे सर्वात शुभ -

वृषभ राशी - या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, आणि शुक्राचा शनीशी असलेला संबंध सामंजस्यपूर्ण असतो. जर एखाद्या वृषभ राशीच्या जातकाच्या कुंडलीत शनी ग्रह कमजोर असेल किंवा प्रतिकूल परिणाम देत असेल, तर नीलम परिधान करणे अत्यंत लाभदायक ठरते. हे रत्न आर्थिक स्थिरता आणि आत्मबळ वाढविण्यात सहायक आहे.

advertisement

मकर राशी (Capricorn) - मकर राशीचे स्वामी स्वयं शनी देव आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी नीलम परिधान करणे विशेषतः शुभ मानले जाते. हे रत्न करिअरमध्ये यश, प्रगती आणि सन्मान मिळविण्यात मदत करते.

मिथुन राशी (Gemini) - मिथुन राशीचे जातक बुद्धिमान आणि विचारशील असतात. नीलम त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेला वाढवते आणि कार्यात स्थिरता प्रदान करते. हे रत्न मानसिक एकाग्रता आणि आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त आहे.

advertisement

कुंभ राशी (Aquarius) - कुंभ राशीचे स्वामी देखील शनी ग्रहच आहेत, त्यामुळे नीलम या राशीसाठी खूप शुभ ठरते. हे रत्न भाग्य मजबूत करते, नवीन संधी प्रदान करते आणि जीवनातील अडथळे दूर करते.

मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं

नीलम परिधान करण्याची योग्य पद्धत

advertisement

नीलम कधीही विधी-विधानाशिवाय घालू नये.

ते धारण करण्यापूर्वी गंगाजल किंवा कच्चे दूध वापरून शुद्ध करावे.

नीलम शनिवारच्या दिवशी, विशेषतः शनीच्या शुभ वेळेत धारण करणे सर्वोत्तम मानले जाते.

हे रत्न नेहमी अनामिकेमध्ये (Ring Finger) किंवा मध्यमेमध्ये (Middle Finger) परिधान केले पाहिजे.

नीलम धारण करताना "ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा 11 किंवा 108 वेळा जप करणे शुभ फळ देते.

advertisement

नीलम रत्नाशी संबंधित खबरदारी -

नीलम हे तीव्र प्रभाव असलेले रत्न आहे, त्यामुळे ते घालण्यापूर्वी एखाद्या योग्य ज्योतिष्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हे रत्न तुमच्या ग्रहांना अनुकूल नसेल, तर त्याचे परिणाम विपरीत देखील होऊ शकतात.

दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Blue Sapphire: अंगठीत धारण करावं निळ्या रंगाचं हे रत्न! 4 राशींना जबरदस्त लाभतं; शनिची ताकद दुप्पट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल