तुळशीचे रोप - हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक मानले जाते. धार्मिक महत्त्वासोबत आरोग्य आणि पर्यावरणासाठी देखील खूप फायदेशीर आहे. वास्तुनुसार, तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा ठेवतं. घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला ते लावणं शुभ मानलं जातं. तुळशीची पूजा करून सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने घरात शांती आणि समृद्धी राहते.
advertisement
मनी प्लांट - मनी प्लांट हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मनी प्लांटला घरात लावल्याने आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं. हे झाड घराच्या आत किंवा बाहेर कुठेही लावता येतं. मनी प्लांटमुळे घरातला तणाव कमी होतो आणि सुख-समृद्धी वाढते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या आग्नेय कोपऱ्यात मनी प्लांट लावावा, कारण ही दिशा संपत्तीच्या वाढीशी आणि आर्थिक स्थिरतेशी संबंधित आहे.
बांबू प्लांट - वास्तू आणि फेंगशुई दोन्हीमध्ये बांबू प्लांटला नशीब, दीर्घायुष्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यानं आनंद आणि शांती राहते आणि व्यवसायातही प्रगती होते. वास्तुनुसार, ते घराच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ही वनस्पती दीर्घकाळ हिरवी राहते आणि कमी काळजी घेतल्यासही सहज वाढते.
वास्तूदोष! देव्हाऱ्याच्या बाबतीत या चुका करू नयेत; नंतर नुसता पश्चाताप होतो
मोगरा - मोगरा फुलांचा सुगंध मनाला त्वरित शांती आणि विश्रांती देतो. वास्तुशास्त्रानुसार, मोगरा वनस्पती घरात प्रेम, सुसंवाद आणि सकारात्मक वातावरण आणते. मोगरा अंगणात, बाल्कनीत किंवा अशा ठिकाणी लावावे जिथे त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरेल.
झेंडू वनस्पती - झेंडूच्या फुलांना पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे, ते उत्साहाचे प्रतीक मानले जाते. वास्तुनुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा बागेत झेंडूचे रोप लावणे खूप शुभ आहे. त्याच्या चमकदार पिवळ्या आणि नारंगी कळ्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. तसेच, ही वनस्पती घराचे वातावरण चैतन्यशील आणि आकर्षक बनवते.
पीस लिली - पीस लिली वनस्पती घरात शांतता राखण्यासाठी ओळखली जाते. पीस लिली घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते आणि तणाव कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार, पीस लिली बैठकीच्या खोलीत किंवा बेडरूममध्ये ठेवणे चांगले. त्याची हिरवी पाने आणि पांढरी फुले घराचे सौंदर्य वाढवतात आणि वातावरण शांत करतात.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)