दक्षिणे दिशेचा संबंध - वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला यमाची दिशा मानले जाते. ही दिशा स्थिरता, निर्णय आणि काही प्रमाणात पूर्णतेशी संबंधित आहे. या दिशेला तोंड करून जेवायला बसल्यास आपल्या आतली ऊर्जा थंड, जड आणि मंद बनते. याचा थेट परिणाम आपल्या जीवनातील नातेसंबंध, आकर्षण आणि आर्थिक प्रवाहाच्या पैलूंवर होतो.
शुक्र आणि दक्षिण दिशेचा संबंध
advertisement
शुक्र ग्रह हा प्रेम, विलासिता, पैसा, नातेसंबंध आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. आपण चुकीच्या दिशेला विशेषतः दक्षिण दिशेला तोंड करून जेवतो तेव्हा आपण स्वतः शुक्राच्या उर्जेला गमावतो. यामुळे नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण होतेच, शिवाय व्यक्तीला एकटेपणा, पैशाचा अभाव आणि आत्मविश्वासाचा अभाव जाणवू लागतो.
भयंकर त्रासातही जिद्द सोडली नव्हती! या राशींना अखेर कष्टाचं फळ मिळणार, गेमचेंज
दक्षिणेला तोंड करून जेवण्याचे तोटे -
नात्यांमध्ये तणाव - पती-पत्नीमधील भांडणे वाढू शकतात, परस्पर समज राहत नाही.
लोक तुमचे बोलणे गांभीर्याने घेत नाहीत, सामाजिक जीवन खराब होऊ शकते.
कमाई करूनही पैसा टिकत नाही, शिवाय खर्चही वाढतो.
प्रेम आणि प्रणयाशी संबंधित आनंदाचे क्षण कमी होऊ शकतात.
विलासिता पूर्ण मिळत नाही. कार, ब्रँड, प्रवास यासारख्या गोष्टी लाभत नाहीत.
योग्य दिशा कोणती?
वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून जेवण करणे सर्वात शुभ मानले जाते. या दिशा जीवनात सकारात्मक ऊर्जा, वाढ, संबंध आणि समृद्धी आणतात. विशेषतः ज्यांना मानसिक शांती हवी आहे, नातेसंबंध चांगले राखण्याची इच्छा आहे, त्यांनी ईशान्य दिशेकडे तोंड करून जेवावे.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)