आग्नेय दिशा (दक्षिण-पूर्व): ही दिशा मनी प्लांटसाठी सर्वात शुभ मानली जाते. या दिशेवर गणपती आणि शुक्र ग्रहाचे आधिपत्य असते. या दिशेला मनी प्लांट ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि धन-समृद्धी वाढते.
पूर्व दिशा: ही दिशा टाळणे चांगले. पूर्व दिशेला मनी प्लांट ठेवल्यास घरात वाद आणि मतभेद वाढू शकतात.
ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व): ही दिशा देखील मनी प्लांट ठेवण्यासाठी योग्य नाही. या दिशेला ठेवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. वायव्य दिशेला मनी प्लांट ठेवल्याने आर्थिक व्यवहार बिघडू शकतात.
advertisement
मनी प्लांट ठेवण्याचे नियम -
वेल जमिनीवर पसरू देऊ नका: मनी प्लांटच्या वेली जमिनीवर पसरू नयेत. त्या दोरीच्या किंवा काठीच्या मदतीने वर चढवाव्यात. वेली खाली पसरल्या तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे आर्थिक प्रगती थांबते.
देवाच्या परिक्रमांचा नियम चुकवू नका! विधीपूर्वक पूजेसाठी या गोष्टी ध्यानात ठेवा
पाने सुकलेली नसावीत: मनी प्लांटची पाने पिवळी किंवा सुकलेली दिसल्यास लगेच ती काढा. सुकलेली पाने घरात नकारात्मकता आणतात. शक्य असल्यास मनी प्लांटची कुंडी हिरव्या किंवा निळ्या रंगाची असावी, जेणेकरून सकारात्मकता टिकून राहते.
घराबाहेर ठेवू नका: मनी प्लांट घराच्या आत ठेवणे शुभ मानले जाते, खासकरून लिव्हिंग रूममध्ये किंवा कार्यालयात. ते घराबाहेर लावल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.
मनी प्लांटचे फायदे - मनी प्लांटचे रोप हवा शुद्ध करते, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. मनी प्लांट मानसिक ताण कमी करण्यास मदत करते. घरात योग्य दिशेला ठेवल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी येते.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)