TRENDING:

Vastu Tips: घरात या दिशेला असतं शनिमहाराजांचं स्थान; तिथं अशा गोष्टी केल्यानं कुटुंब लागतं अधोगतीला

Last Updated:

Shani Vastu Tips: शनिदेवाचे नाव ऐकताच अनेकांना भीती वाटते. घरात शनीचेही स्थान आहे. शनिदेव पश्चिम दिशेचा स्वामी आहेत. पश्चिमेला शनीचे राज्य असल्यानं वास्तुशास्त्रात या दिशेला काही गोष्टी करू नयेत असा सल्ला दिला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शनिदेवाच्या स्थानाला महत्त्वाचे मानले जाते. शनि हा पश्चिम दिशेचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे, घराच्या पश्चिम दिशेशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते, जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि घरात सुख-शांती कायम नांदेल. शनी कुंडलीत असतो तसाच त्याचे आपल्या घरातही स्थान आहे. जर शनीच्या ठिकाणी काही निषिद्ध गोष्टी केल्यास  कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळू शकतो.
News18
News18
advertisement

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेचा स्वामी, त्यांची ऊर्जा इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. यासोबतच कोणती दिशा कोणती काम करण्यासाठी योग्य आहे याचे मार्गदर्शन देखील मिळते. यापैकी एक दिशा शनिदेवाची देखील आहे. शनिदेवाचे नाव ऐकताच अनेकांना भीती वाटते. घरात शनीचेही स्थान आहे. शनिदेव पश्चिम दिशेचा स्वामी आहेत. पश्चिमेला शनीचे राज्य असल्याने, वास्तुशास्त्रात या दिशेला काही गोष्टी करू नयेत असा सल्ला दिला जातो. पश्चिम दिशेला काही चुकीच्या गोष्टी केल्यानं आर्थिक नुकसान, करिअरमध्ये आव्हाने, नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. पश्चिमेला काय असावे, काय असू नये याबद्दल जाणून घेऊ.

advertisement

घराच्या पश्चिम दिशेला बेडरूम असू नये किंवा त्या दिशेला असल्यास रुमची गॅलरी पश्चिमेला असावी. पश्चिम दिशेची बेडरुम करिअर धोक्यात आणू शकते. पती-पत्नी पश्चिम दिशेला बेडरूममध्ये झोपले तर त्याचा त्यांच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते.

7 जुलैपासून शुक्राचा शक्तिशाली नवपंचम योग; 3 राशींच्या करिअरला मोठी उसळी

advertisement

स्वयंपाकघर - पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बांधू नये. अन्यथा घरात कधीही समृद्धी येणार नाही. अनावश्यक खर्च वाढतील. घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहणार नाही. तसेच, घरात धन-धान्य संपण्याची वेळ येऊ शकते.

देव्हारा - पश्चिम दिशेला घरात देव्हारा बांधू नका. यामुळे घरप्रमुखाच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. आरोग्य आणि आर्थिक स्थिती बिघडते. घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर त्याच्या समोर सावलीचे झाड लावा. जर खिडक्या असतील तर त्यांचा आकार पूर्व दिशेच्या खिडक्यांपेक्षा थोडा लहान ठेवा. पश्चिम दिशेला तुटलेले फर्निचर, खराब वस्तू ठेवू नका, अन्यथा घरात कायमची गरिबी येईल. अनेक त्रास सोसावे लागू शकतात.

advertisement

संकटं टळणार! चातुर्मासातील चार महिने 5 राशींना लकी; शिव-विष्णू कृपेनं सुवर्णकाळ

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घरात या दिशेला असतं शनिमहाराजांचं स्थान; तिथं अशा गोष्टी केल्यानं कुटुंब लागतं अधोगतीला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल