दिवाळीचा सण नेमका कधी - परिषदेने या विषयावर एक विशेष बैठक आयोजित केली होती, ज्यात दिवाळीशी संबंधित तिथीच्या निश्चितीवर सविस्तर विचार करण्यात आला. धर्मशास्त्रीय व्यवस्था आणि शास्त्रानुसार केलेल्या गणनेनुसार, पूर्ण प्रदोष काळ व्यापिनी तिथी फक्त २० ऑक्टोबर रोजीच मिळत असल्याचा निष्कर्ष निघाला.
तर, २१ ऑक्टोबर रोजी तीन प्रहरांपेक्षा अधिक अमावस्या आणि साडेतीन प्रहरांपेक्षा अधिक वृद्धीगामिनी प्रतिपदा असल्यामुळे नक्त व्रत पारण करण्याचा काळ त्या दिवशी उपलब्ध होत नाहीये. याच कारणामुळे परिषदेने सर्वसंमतीने २० ऑक्टोबर रोजीच दिवाळीचा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
२०२४ मध्येही असाच योग होता -
काशी विद्वत परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आणि काशी हिंदू विश्वविद्यालयाचे प्रोफेसर रामनारायण द्विवेदी यांनी सांगितले की, सनातन धर्मात व्रत-सणांच्या तिथी निश्चित करण्याची प्रक्रिया गणितीय गणना आणि धर्मशास्त्रीय नियमांवर आधारित असते. परंतु कधीकधी गणितीय भिन्नता किंवा एखाद्या एका मतामुळे व्रत-सणांच्या तिथींमध्ये फरक दिसू लागतो. अशीच स्थिती साल २०२४ मध्येही निर्माण झाली होती, तेव्हा परिषदेने शास्त्रानुसार निर्णय घेतला होता आणि संपूर्ण देशाने त्याचनुसार दिवाळी साजरी केली होती.
यावेळीही काही पंचांगांमध्ये २० ऑक्टोबर तर काहीमध्ये २१ ऑक्टोबर रोजी दिवाळी लिहिली गेल्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. यावर परिषदेच्या धर्मशास्त्र आणि ज्योतिष कक्षाची ऑनलाईन बैठक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी परिषदेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रो. रामचंद्र पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं
या बैठकीत उपस्थित सर्व विद्वानांनी शास्त्रीय आधारावर सांगितले की, २० ऑक्टोबर २०२५ रोजीच दिवाळी साजरी केली पाहिजे, कारण त्या दिवशीच लक्ष्मी पूजनासाठी प्रदोषकाळाचा योग जुळून येत आहे. शेवटी परिषदेने स्पष्टपणे सांगितले आहे की, "सर्व सनातन धर्मियांनी शास्त्रवचनांचे पालन करत एकमताने २० ऑक्टोबर २०२५ रोजीच दिवाळी साजरी करावी."
दिवाळीचा शुभ मुहूर्त (Diwali 2025 Shubh Muhurat) - ज्योतिषाचार्यांच्या मते, यावर्षी २० ऑक्टोबर रोजीच दिवाळी साजरी केली जाईल. द्रिक पंचांगानुसार, यावर्षी अमावस्या तिथीची सुरुवात २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी होईल आणि तिथीची समाप्ती २१ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ०३ मिनिटांनी होईल.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी-गणेश पूजनासाठी सर्वात शुभ वेळ संध्याकाळी ७ वाजून ०८ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल. हा कालावधी प्रदोष काळ आणि स्थिर लग्न यांचा संयोग मानला गेला आहे, जो माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची कृपा प्राप्त करण्यासाठी उत्तम मानला जात आहे. म्हणजेच लोकांना पूजेसाठी सुमारे १ तास ११ मिनिटांचा वेळ मिळेल.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)