ज्योतिषी डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्या मते, मूलांक 1 वर जन्मलेल्या मुली त्यांच्या स्वाभिमानाबद्दल खूप जागरूक असतात. स्वाभिमानाशी तडजोड होऊ देत नाहीत. या मुली खूप रागीट स्वभावाच्या मानल्या जातात. मूलांक 1 म्हणजे कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 रोजी जन्मलेले लोक.
या मुली कोणताही अन्याय किंवा चुकीचे वर्तन सहन करू शकत नाहीत. त्यावर त्यांचे विचार व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांचा राग सहसा तेव्हाच प्रकट होतो जेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो किंवा त्यांच्या कामात मुद्दाम कोणी आडवा येतो. 28 तारखेला जन्मलेल्या मुली कमी रागीट आणि जास्त चिडचिड्या असतात, त्यांचा छोट्या छोट्या गोष्टींवरही बीपी वाढतो.
advertisement
मंगळवारपासून अमंगळ मागे लागणार! 72 दिवसांचा हा काळ 4 राशींना त्रस्त करणार
मूलांक 1 असणाऱ्या मुली स्वाभिमानी असतात, त्या मेहनतीने आणि क्षमतेने इतरांना प्रभावित करतात. त्यांचे कोणतेही निर्णय बहुतेकदा तार्किक आणि अचूक असतात, जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. तिला तिच्या मर्यादा चांगल्या प्रकारे ठाऊक असतात आणि त्यावर ठाम राहतात. त्यांचा हा स्वभाव कधीकधी इतरांना हट्टी वाटू शकतो. अशा मुली त्यांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवून मोठे यश मिळवू शकतात.
फेब्रुवारीत या राशींचा करिष्मा! ग्रहांचा राजकुमार दोनदा भरभरून देणार, धनलाभ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)