TRENDING:

दिवाळीत फॅमिलीसाठी बेस्ट 7-सीटर कार हवीये? 6 लाखांत हे आहे बेस्ट ऑप्शन

Last Updated:

Renault Triber: कमी बजेटमध्ये येत असलेल्या या 7 सीटर कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स आहेत. हे 1.0-लिटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते. जे 72 PS पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Best Under Budget 7 Seater Car for Family: तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही फक्त 6 लाख रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणू शकता. ही कार स्पेसमध्ये इतकी मोठी आहे की, तुमचे कुटुंब त्यात पूर्णपणे बसेल.
ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
advertisement

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत त्याचे नाव Renault Triber आहे, जी एक उत्कृष्ट मल्टी पर्पज व्हेइकल (MPV) आहे. ही कार एका मोठ्या कुटुंबासाठी तयार करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया रेनॉल्ट ट्रायबरची किंमत आणि फीचर्स काय आहेत.

विना गिअरची बाईक लॉन्च, जबरदस्त आहे डिझाइन; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

advertisement

Renault Triber ची किंमत आणि फीचर्स

Renault Triber ची किंमत 5 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते. कमी बजेटमध्ये येत असलेल्या या 7 सीटर कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स आहेत. ही कार 1.0-लिटर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते. जी 72 PS पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करू शकते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा फीचर्स आहे.

advertisement

Renault Triber मध्ये 14-इंच फ्लेक्स व्हील दिसत आहे. यात पियानो ब्लॅक फिनिशसह ड्युअल टोन डॅशबोर्ड, ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसाठी सपोर्ट असलेली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, संपूर्ण डिजिटल व्हाइट LED इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,नवीन स्टायलिश फॅब्रिक अपहोल्स्ट्री, सोबतच HVAC नॉब्स विथ क्रोम रिंग, ब्लॅक इनर डोर हँडलसारखे फीचर्स पाहायला मिळतात.

बजेट ठेवा तयार! धुव्वा उडवण्यासाठी येताय 5 स्वस्त कार, कधी होणार लॉन्च?

advertisement

कार किती मायलेज देते

याशिवाय ट्रायबर कारमध्ये पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, सिक्स-वे ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, LED डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, स्टीयरिंगवरील ऑडिओ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. कारच्या मॅन्युअल व्हेरियंटसह 19 kmpl पर्यंत मायलेज मिळू शकते. ही MPV कार एकूण 10 व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ही कार 20 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. कारमध्ये 84 लीटरची बूट स्पेस आहे. याला थर्ड रो सील्ड फोल्ड करुन 625 पर्यंत वाढवलं जाऊ शकतं.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
दिवाळीत फॅमिलीसाठी बेस्ट 7-सीटर कार हवीये? 6 लाखांत हे आहे बेस्ट ऑप्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल