2025 KTM 1390 Super Adventure S Evo मध्ये पूर्वीपेक्षा मोठे इंजिन आहे. जिथे आधी त्याचे इंजिन 1301cc होते, आता ते 1350cc केले आहे. हे नवीन इंजिन 173 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते. याव्यतिरिक्त, ही मोटरसायकल लेटेस्ट युरो 5+ होमोलॉगेशन स्टँडर्डचे पालन करते, ज्यामुळे ती पर्यावरणास अनुकूल आहे.
advertisement
बजेट ठेवा तयार! धुव्वा उडवण्यासाठी येताय 5 स्वस्त कार, कधी होणार लॉन्च?
या नवीन मोटारसायकलचे आणखी एक फीचर म्हणजे तिचे सेमी-ॲक्टिव्ह सस्पेन्शन टेक्नॉलॉजी (सॅट), जे WP ने विकसित केले आहे. यात थ्रू-रॉड सेटअप देखील आहे. जे संवेदनशीलता वाढवते आणि राइड करताना घर्षण कमी करते. ज्यामुळे खुप स्मूदर राइडचा अनुभव मिळतो. या तंत्रज्ञानामुळे रायडरला सर्व प्रकारच्या रस्त्यांवर उत्तम कामगिरीची खात्री दिली जाते.
नवीन टेक्नॉलॉजीसह येते
मोटारसायकल सर्व-नवीन 8.8-इंच व्हर्टिकल पोझिशनच्या TFT डिस्प्लेसह अपडेट केली गेली आहे. स्क्रीन फक्त सोपी यूझर इंटरफेसच देत नाही, तर यात इंडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा वापरही केला गेलाय. ज्यामुळे रायडर्स हातमोजे परिधान करूनही स्क्रीन ऑपरेट करू शकतात. तसेच, ते अँटी-रिफ्लेक्स, अँटी-फिंगरप्रिंट आणि अँटी-ग्लेअर प्रॉपर्टीजसह येते.
उत्तम टायर आणि ब्रेकिंग सिस्टम
KTM 1390 Super Adventure S Evo मध्ये 19-इंच फ्रंट व्हील आणि 17-इंच मागील चाक आहे. यात नवीन डनलॉप मेरिडियन टायर्स बसवलेले आहेत. ज्याचा Ice-X ट्रेड पॅटर्न पाण्याचा उत्तम निचरा सुनिश्चित करतो आणि ऑफ-रोड कंडीशन्समध्येही उत्कृष्ट ट्रॅक्शन देतो. याव्यतिरिक्त, नवीन ब्रेम्बो फ्रंट मास्टर सिलेंडर आणि अपग्रेड केलेल्या फ्रंट ब्रेक पॅड्सच्या वापराने ब्रेकिंग परफॉर्मेंसमध्येही सुधारणा केली गेली आहे.
SBI वरुन 6 लाखांचं कार लोन घेतल्यावर मंथली EMI किती येईल? व्याज किती? घ्या जाणून
रडार सिस्टम देते एक्स्ट्रा सेफ्टी
2025 KTM 1390 Super Adventure S Evo मध्ये एकूण पाच राइडिंग मोड आहेत - रेन, स्ट्रीट, स्पोर्ट, ऑफरोड आणि कस्टम. याशिवाय, बाईकमध्ये Bosch चा 5th जनरेशन फ्रंट रडार सेन्सर देण्यात आला आहे. जो प्रगत सेफ्टी फीचर्सला सपोर्ट करते.