विशेषतः क्लच वापरण्याची पद्धत जर चुकीची असेल, तर त्याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेजबरोबरच क्लच प्लेटच्या लाईफवरही होतो. त्यामुळे क्लचचा योग्य वापर तुमच्या गाडीचा मायलेज वाचवू शकतो.
क्लच वापराच्या चुकीच्या सवयी कोणत्या?
हाफ क्लचवर गाडी चालवणे – अनेकजण गाडी हळू चालवताना क्लच अर्धवट दाबून ठेवतात, ज्यामुळे क्लच प्लेट घासली जाते आणि मायलेज कमी होते.
advertisement
ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच दाबणे - सतत क्लच वापरणंही प्लेट खराब करतं आणि इंधन जास्त खर्च होतं.
गाडी थांबवताना जोरात क्लच दाबणे - अचानक क्लच दाबल्यामुळे गाडीचे यंत्रणा असंतुलित होते.
मग नक्की काय करावं?
क्लचचा वापर फक्त 20 किमी/ता. पेक्षा कमी वेगात करा.
गिअर बदलतानाच क्लच वापरा, इतरवेळी टाळा.
गाडी थांबवताना आधी ब्रेक दाबा, मग क्लच वापरा.
ट्रॅफिकमध्ये गाडी न्यूट्रलमध्ये ठेवा, अनावश्यक क्लच वापर टाळा.
हाफ क्लचचा वापर पूर्णपणे टाळा.
जर तुम्ही या सवयी सुधारल्या तर गाडीचं मायलेज तब्बल 30 टक्क्यांपर्यंत वाढवणं शक्य आहे आणि क्लच प्लेटही जास्त काळ टिकते. योग्य क्लच वापर हे मायलेज वाढवण्यासाठीचं मोठं शस्त्र ठरू शकतं.