ई-बाइक टॅक्सीसाठी नियमावली
ॲग्रिगेटर्सकडे परवान्यासाठी किमान 50 ई-बाइक असणे आवश्यक असेल. तसेच याचे भाडेदेखील आरटीएकडूनच ठरवले जाईल.
शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व बाइक टॅक्सी एकाच रंगाच्या असाव्यात आणि त्यावर 'बाइक टॅक्सी' हे शब्द स्पष्टपणे लिहिलेले असले पाहिजेत. तसेच सेवा प्रदात्याचे नाव आणि संपर्क क्रमांकदेखील लिहिलेला असावा.
महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सर्व बाइक टॅक्सींमध्ये चालक आणि प्रवाशामध्ये एक विभाजक असणे आवश्यक असणार आहे.
advertisement
सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सर्व रायडर्ससाठी अनिवार्य जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क पर्याय आणि कडक पार्श्वभूमी तपासणीदेखील नियमांमध्ये समाविष्ट आहे.
ड्रायव्हरकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि ट्रान्सपोर्ट बॅज असणे आवश्यक आहे. तसेच, ड्रायव्हर्ससाठी पात्र वय 20 ते 50 वर्षे आहे.
एक चालक दररोज जास्तीत जास्त आठ तास काम करू शकेल. सेवा सुरू करण्यापूर्वी ॲग्रिगेटर्सना चालकांना योग्य प्रशिक्षण द्यावे लागेल, असेही जीआरमध्ये म्हटले आहे.
Elphinstone Bridge: आता होणार ट्रॅफिक जॅम! एल्फिस्टन पूल आजपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते असतील
त्या संस्थांवर कारवाई होणार
इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी अद्याप सुरू झालेली नाही. परंतु, उबर आणि रॅपिडोसारख्या अॅपवर बाइक टॅक्सी बुक करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. असे प्रकार अनधिकृत असून संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर कमिशन आकारणी नाही
बाइक पूलिंग सिस्टीम अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी चालविण्यासही परवानगी देण्यात आली आहे. रायडर्स शहराच्या हद्दीत दररोज जास्तीत जास्त 4 आणि शहराबाहेर 2 राइड्स देऊ शकतात. ॲग्रिगेटर्सकडून अशा पूलिंग दरम्यान कोणतेही कमिशन आकारले जाऊ शकणार नाही.