TRENDING:

Car Dashboard Lights : डॅशबोर्डवर ही LED ही लाइट दिसली? लगेच कार थांबवा, दुर्लक्ष करणं जीवावर बेतेलं

Last Updated:

Dashboard Warning Lights Explained : हे लक्षात घ्या की कारच्या डॅशबोर्डवरी LED चेतावणी लाइट्सकडे दुर्लक्ष करणं तुमच्या कारसाठी घातक ठरू शकतं. चला तर मग जाणून घेऊया, या महत्त्वाच्या वॉर्निंग इंडिकेटर्सबद्दल

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येक कारच्या डॅशबोर्डवर अनेक LED चेतावणी लाइट्स असतात, कारच्या एखाद्या पार्टमध्ये बिघाड असेल तर त्याचे याची माहिती हे लाइट देतात. पण बहुतांश वेळा आपण त्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करतो किंवा अनेकांना हे सिग्नल समजत नाही, ज्यामुळे कधीकधी ते संकटात देखील सापडतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

हे लक्षात घ्या की कारच्या डॅशबोर्डवरी LED चेतावणी लाइट्सकडे दुर्लक्ष करणं तुमच्या कारसाठी घातक ठरू शकतं. चला तर मग जाणून घेऊया, या महत्त्वाच्या वॉर्निंग इंडिकेटर्सबद्दल

1. इंजिन वॉर्निंग लाइट (Check Engine Light)

जर ही लाइट डॅशबोर्डवर दिसू लागली, तर समजा की इंजिन किंवा संबंधित भागात काहीतरी बिघाड झाला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास इंजिनला मोठं नुकसान होऊ शकतं.

advertisement

2. बॅटरी वॉर्निंग लाइट

ही लाइट चार्जिंग सिस्टम किंवा बॅटरीत बिघाड दर्शवते. वेळेत उपाय केला नाही, तर बॅटरी पूर्णपणे डाऊन होऊ शकते आणि कार सुरूच होणार नाही.

3. ऑईल प्रेशर वॉर्निंग लाइट

ही लाइट दाखवत असल्यास, इंजिनमध्ये तेलाचा दाब कमी झाला आहे. तेलाच्या अभावामुळे इंजिन खराब होण्याचा धोका असतो. लगेच इंजिन ऑईल चेक करा.

advertisement

4. ब्रेक वॉर्निंग लाइट

ही लाइट ब्रेक सिस्टीममध्ये अडचण दर्शवते. ब्रेक फ्लुइड कमी असणे, ब्रेक पॅड झिजलेले असणे अशा कारणांनी ही लाइट चालू होते. याकडे दुर्लक्ष केल्यास ब्रेक फेल होण्याची शक्यता असते.

5. एअरबॅग वॉर्निंग लाइट

जर ही लाइट लागली, तर समजून घ्या की एअरबॅग सिस्टम व्यवस्थित काम करत नाही. अपघाताच्या वेळी एअरबॅग ओपन न होण्याचा धोका असतो.

advertisement

या लाइट्स चालू झाल्यास काय कराल?

कारचं मॅन्युअल जरूर वाचा. शक्य असल्यास तत्काळ गॅरेजमध्ये गाडी न्या, प्रमाणित मॅकेनिकचा सल्ला घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

एक छोटीशी लाइट तुमच्या गाडीला मोठ्या खर्चापासून वाचवू शकते. म्हणून कारच्या डॅशबोर्डवर लक्ष ठेवा आणि अशा कोणत्याही वॉर्निंग लाइट्स दिसल्यास वेळ न घालवता त्यावर ताबडतोब उपाय करा.

मराठी बातम्या/ऑटो/
Car Dashboard Lights : डॅशबोर्डवर ही LED ही लाइट दिसली? लगेच कार थांबवा, दुर्लक्ष करणं जीवावर बेतेलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल