तुमच्यासोबत ही असंच होतं का? कार चालवताना आधी ब्रेक दाबायचा का गेअर बदलायचा असा प्रश्न तुम्हाला ही पडतो का? मग तुमच्यासाठी हा लेख फायद्याचा आहे. चला सविस्तर जाणून घेऊ.
गियर बदलायचा की ब्रेक दाबायचा?
खरंतर वेगवेगळ्या परिस्थीतीत वेगवेगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे.
जर तुम्ही हायवेवर किंवा मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवत असाल आणि स्पीड जास्त असेल, तर सगळ्यात आधी ब्रेक दाबावा! त्यामुळे गाडीचा वेग थोडा कमी होईल आणि त्यानंतर क्लच दाबून गियर बदलता येईल.
advertisement
ट्रॅफिकमध्ये किंवा व्यस्त रस्त्यावर
जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये किंवा गर्दीच्या रस्त्यावर असाल, तर सर्वप्रथम क्लच दाबा, नंतर ब्रेक लावा आणि मग गियर बदला. यामुळे गाडी सहजपणे गती कमी करेल आणि इंजिन देखील बंद होणार नाही.
योग्य ड्रायव्हिंगसाठी हे लक्षात ठेवा!
हायवेवर आधी ब्रेक आणि मग क्लच
गर्दीच्या रस्त्यावर आधी क्लच आणि मग ब्रेक
वेग जास्त असेल तर अचानक क्लच दाबू नका, अन्यथा गाडीचा बॅलन्स बिघडू शकतो.
राजेशनेही हे नियम पाळायला सुरुवात केली आणि काही दिवसांतच तो उत्तम ड्रायव्हर झाला, तुम्हालाही ड्रायव्हिंग करताना असे प्रश्न पडतात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.