पण अजूनही असे लोक आहेत ज्यांना ही नंबरप्लेट लावण्याची प्रक्रिया माहित नाही, तसेच या प्रोसेसला किती खर्च येईल हे माहित नाही, अशाच लोकांसाठी हा लेख आहे. ज्यामुळे तुम्हाला ही प्रक्रिया सोपी जाईल आणि कोणी फसवणूक देखील करणार नाही.
HSRP प्लेट मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर (उदा. www.bookmyhsrp.com) जाऊन तुमच्या वाहनाची माहिती भरावी लागते. त्यात वाहनाचा नंबर, चेसिस नंबर, RTO डिटेल्स, इत्यादी माहिती द्यावी लागते. यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या डेटला नजीकच्या अधिकृत फिटिंग सेंटरमध्ये जाऊन प्लेट बसवून घ्यावी लागते.
advertisement
HSRP नंबर प्लेटचे दर किती आहेत?
HSRP नंबर प्लेटचे दर वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असतात:
दुचाकी वाहनांसाठी – ₹350 ते ₹400 रुपये
चारचाकी (कार)साठी – ₹600 ते ₹750 रुपये
व्यावसायिक वाहनांसाठी (CV) – ₹800 रुपये पेक्षा अधिक असू शकतात
या दरामध्ये HSRP प्लेटसह color-coded fuel sticker चाही समावेश असतो (फक्त चारचाकींसाठी आवश्यक).
का आहे HSRP गरजेची?
HSRP मध्ये लेझर कोड, बारकोड आणि यूनिक सिरीयल नंबर असतो. त्यामुळे चोरी, बनावट नंबर प्लेट, आणि वाहन ओळखास मदत होते. तसेच खोटेनंबरप्लेट बनवण्याचे प्रकार थांबवता येतात. अनेक राज्यांमध्ये यासाठी आता दंडही आकारला जातो.
जर अजूनही तुमच्या वाहनावर HSRP नाही, तर लवकरात लवकर अधिकृत पोर्टलवरून बुक करा आणि दंड वाचवा.