यूरोपियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच यूरो NCAP हे यूरोपमधील सर्वात विश्वासार्ह क्रॅश टेस्ट करणारी एक संस्था आहे. NCAP मध्ये गाड्यांच्या सुरक्षेची खास तपासणी केली जाते. NCAP ही नवीन गाड्यांना चार प्रकारामध्ये टेस्ट करते. प्रौढ प्रवासी सुरक्षा, मुलांची सुरक्षा, रस्त्यावर असलेल्या लोकांची सुरक्षा आणि गाडीमधील तांत्रिक बाबी, आदीचा तपास करून ५ स्टार रेटिंग देत असते.
advertisement
नवीन hyundai nexo ने या सर्व चारही श्रेणींमध्ये दमदार अशी कामगिरी केली आहे. यामध्ये प्रौढ सुरक्षा 90 टक्के आणि मुलांच्या सुरक्षेत 85 टक्के गुण मिळाले आहे. प्रौढ सुरक्षेत, समोरून धडक दिल्यावर प्रवासी केबिन स्थिर राहिला आणि ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या गुडघ्यांसह सर्व महत्त्वाच्या अवयवांची चांगली सुरक्षा झाली.
hyundai nexo ने फुल-विथ रिगिड बॅरियर टेस्टमध्येही मजबूत कामगिरी केली, साइड बॅरियर टेस्टमध्ये जास्तीत जास्त गूण मिळवले आणि सेंटर एअरबॅगमुळे दूर बसलेल्या प्रवाशाचीही चांगली सुरक्षा झाली. मागून धडक दिल्यावर पुढच्या आणि मागच्या दोन्ही सीटसाठी व्हिपलॅश सेफ्टीला चांगले मानलं गेलं.
लहान मुलांची टेस्टही पास
लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही hyundai nexo ची कामगिरी मजबूत राहिली. सहा आणि दहा वर्षांच्या डमी मुलांना समोरून आणि साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये सर्व महत्त्वाच्या अवयवांची चांगली सुरक्षा मिळाली आणि जास्तीत जास्त गूण मिळाले. अतिरिक्त सुरक्षा फीचर्समध्ये फ्रंटला एअरबॅग बंद करण्याची सोय, त्याची स्थिती स्पष्टपणे दाखवणारे इंडिकेटर्स आणि सर्व योग्य चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टीमसाठी सुरक्षित इन्स्टॉलेशन यांचा समावेश आहे.
hyundai nexo ही यूरो NCAP च्या अॅडव्हान्स्ड ई-कॉल सिस्टीम, अपघातानंतर सेकंडरी इम्पॅक्ट प्रिव्हेन्शन टेक्नॉलॉजी आणि वाहन पाण्यात बुडाल्यावर दरवाजा किंवा खिडकी योग्यरित्या काम करत असल्याचंही टेस्टमध्ये स्पष्ट झालं आहे. hyundai nexo ही एक इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनवर चालणारी कार आहे. या कारची किंमत 65 लाख एक्स शोरूम आहे.
