गिअर्स जलद खाली हलवणे का वाईट आहे?
तुम्ही बाईक थांबवण्यासाठी गियर लवकर खाली केला तर तुमच्या बाईकच्या इंजिनवर जास्त दबाव येतो. इतकेच नाही तर इंजिन गरम झाल्यामुळे मायलेज देखील वेगाने कमी होते. जर तुम्ही हे जास्त वेगाने केले तर गियर तुटू शकतो आणि तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
20 ते 30 टक्के मायलेज देईल तुमची जुनी कार! या ट्रिक्स येतील कामी
advertisement
या पार्ट्सला होते नुकसान
तुम्ही बाईकचा गिअर पटकन बदलला तर क्लच प्लेटला नुकसान होते. खरंतर, क्लच प्लेट खराब होऊ लागते आणि त्याच वेळी, त्यामुळे इंजिनच्या इतर घटकांचे नुकसान होते.
गीअर्स कसे बदलायचे
तुम्ही तुमच्या बाईकचा गिअर डाउनशिफ्ट करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही वेग कमी करून फक्त एका गिअरने डाउनशिफ्ट करा. त्यानंतर, जसजसा वेग कमी होत जाईल. तसतसे तुम्ही त्यानुसार खालीही जावे. असे केल्याने तुमच्या बाईकच्या इंजिनवर कोणताही वाईट परिणाम होत नाही आणि तिचे मायलेजही चांगले राहते.