ही जीप SUV यापूर्वी अनेकदा चाचणीदरम्यान दिसली होती. पण आता उत्पादनासाठी तयार असलेल्या मॉडेलचे स्पष्ट फोटो समोर आले आहेत.
बाह्य डिझाइनमध्ये काय बदलले आहे?
नवीन कंपासचा लूक मागील मॉडेलसारखाच आहे. पण त्यात अनेक आधुनिक अपडेट्स करण्यात आले आहेत. पुढील बाजूस स्टायलिश LED हेडलॅम्प, जीपच्या खास 7-स्लॉट ग्रिलसोबत देण्यात आल्यात. यावेळी पातळ लाईटिंग स्ट्रिप्स ग्रिलवर जोडल्या गेल्या आहेत. ज्यामुळे लूक अधिक आकर्षक झाला आहे.
advertisement
( SUV: किती दिवस चालवणार छोटी कार! घ्या 27 किमी मायलेज अन् 6 लाखांची दमदार SUV )
समोरचा बंपर अधिक मजबूत दिसतोय आणि त्यात फॉग लॅम्प देण्यात आलेत. साइड प्रोफाईलमध्ये जाड काळं कव्हर, स्क्वेअर व्हील आर्चेस आणि शोल्डर लाईन्स SUVला एक मस्क्युलर लूक देतात. नवीन LED टेल लाइट्स, छतावरील रेल्स आणि लहान ओव्हरहॅंग्स SUVला स्टायलिश बनवतात. एकंदरीत ही रचना जीपची ओळख टिकवत अधिक आधुनिक वाटते.
केबिन आणि वैशिष्ट्यांमध्ये मोठे बदल
2025 Jeep Compass मध्ये पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड लेआउट दिला जाईल. यात
- मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
- सेंटर कन्सोल स्टोरेज
- रोटरी ड्राईव्ह मोड डायल
- पॅनोरॅमिक सनरूफ
डॅशबोर्डमध्ये प्रीमियम मटेरियल वापरण्यात आले आहे. ज्यामुळे केबिन अधिक आरामदायक आणि आलिशान भासतो.
इंजिन आणि पॉवरट्रेनबाबत काय माहिती आहे?
जीपने अद्याप फेसलिफ्ट कंपासच्या इंजिन पर्यायांची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र ऑटो उद्योगातील रिपोर्ट्सनुसार, हायब्रिड किंवा प्लग-इन हायब्रिड पर्याय यामध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे, खासकरून आंतरराष्ट्रीय बाजारासाठी. भारतात कोणते इंजिन मिळेल, याबाबत अजून स्पष्टता नाही.
भारत लाँच कधी होणार?
नवीन जीप कंपासचे जागतिक पदार्पण 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र भारतातील लाँच 2025 च्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीला होऊ शकते. सध्या भारतात जीप कंपासचे एग्झिस्टिंग मॉडेल विक्रीस उपलब्ध आहे. कंपनी जागतिक प्रतिसाद पाहूनच भारतातील लाँचबाबत निर्णय घेणार आहे.