TRENDING:

Road Safety Week 2025: रस्त्यावर कसेही चालू नका! हे वाहतुकीचे 11 नियम माहिती आहे का?

Last Updated:

वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आले आहेत. याचे जाणीवपूर्वक पालन केले तर सुरक्षित प्रवास सर्वांनाच अनुभवता येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी 
वाहतूक नियंत्रण
वाहतूक नियंत्रण
advertisement

सांगली: भारतात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, रस्त्यांवरून वाहनाने प्रवास करणारे नागरिक तसंच पादचारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक विभागाने वेगवेगळे नियम लागू केले आहेत. आपल्या आणि इतरांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे जाणीवपूर्वक पालन करणं खूप गरजेचं आहे. सध्या देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. 'केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय' लोकांना वाहतूक नियमांबद्दल जागरूक करण्यासाठी हा सप्ताह साजरा करते. या काळात देशभरात विविध माध्यमे आणि पद्धतीद्वारे लोकांना वाहतूक नियमांची माहिती दिली जाते. यामुळे लोक सावधपणे वाहन चालवतील आणि रस्ते अपघात कमी होतील. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती केली जाते.

advertisement

11 ते 17 जानेवारी 2025 म्हणजेच भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. दरवर्षी एक आठवडा लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती केली जाते. 1989मध्ये आपल्या देशात याची सुरुवात झाली. नागरिक सुरक्षितपणे वाहन चालवतात का? याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.

रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान वाहनचालक, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर वाहन चालवण्याचे सुरक्षित मार्ग शिकवले जातात. त्यांना भारतातील वाहतूक नियमांची माहिती दिली जाते. रस्त्यावर बसविण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नलची माहिती दिली जाते. यामध्ये चालकांच्या तपासणीचाही समावेशा आहे. यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस पथनाट्य, परिसंवाद, रॅली, घोषणा, कार्यक्रम, होर्डिंग-बॅनरच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यत संदेश पोहोचवतात. 'रस्ते अपघात कमी करून नगरिकांचे जीवन सुरक्षित ठेवणे' हा या सर्वामागील उद्देश आहे.

advertisement

यंदाच्या रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतुकीचे असे नियम पाहूयात जे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे ठरतील. वाहनाने प्रवास करणारे असोत किंवा पादचारी प्रत्येकाने वाहतुकीचे हे नियम लक्षात ठेवायलाच हवे.

1. अति वेग टाळा: भारतातील रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनांचा वेग होय. वाहनांचा वेग कमी केल्यास अनेक अनर्थ टळू शकतात. त्यामुळे वाहन कोणतेही असो त्याचा वेग निर्धारित वेगाच्या मर्यादेतच ठेवला पाहिजे.

advertisement

2. ओव्हरटेक करू नका:  रस्ते अपघातांचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे एकमेकांना ओव्हरटेक करण्याची स्पर्धा. वाहनांना ओव्हरटेक करताना मोठ्या प्रमाणात टक्कर होऊन अपघात होतात. म्हणून, आपल्या सावकाश वाहन चालवा. इतरांना मागे सोडण्याच्या शर्यतीत स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकू नका.

3. नेहमी डाव्या बाजूने चाला: भारतातील वाहतुकीचा निर्माण पैकी महत्त्वाचा नियम म्हणजे नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला. वाहनाने प्रवास करणारे असो किंवा पदचारी असोत रस्ता एकेरी असो किंवा दुहेरी रस्त्याच्या डाव्या बाजूनेच प्रवास करणे सक्तीचे आहे. पुढे जाताना उजवीकडे वळावे लागल्यास इंडिकेट करा, त्यानंतरच दिशा बदला.

advertisement

4. मद्यपान करून वाहने चालू नका:  दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच आहे. कोणत्याही परिस्थितीत दारू पिऊन गाडी चालवू नका. अशा अवस्थेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते. मद्यपान गाडी चालवल्यास दंड आकारला जातो. कोणत्याही प्रकारची नशा करून गाडी चालवणे म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ ठरू शकतो.

5. मोबाईल फोन टाळा:  आजकाल सर्वात मोठी समस्या मोबाईल फोनची आहे. मोबाईलवर बोलल्याने लक्ष विचलित होते. त्यामुळे तुम्ही वाहनावरील नियंत्रण गमावू शकता. रस्ता गर्दीचा असो किंवा रिकामा असो, वाहन चालवताना तुमचे संपूर्ण लक्ष वाहन चालविण्यावर ठेवा. खूप गरजेचे असेल तर रस्त्याच्या कडेला गाडी थांबवा आणि मग फोनवर बोला.

6. झेब्रा क्रॉसिंग :  वाहन चालक आणि पादचारी दोघांनी वाहतूक नियमांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. पादचाऱ्यांनी नेहमी फूटपाथवरून चालावं, सर्व्हिस लेनमध्ये किंवा अगदी डाव्या बाजूने चालावं. ट्रॅफिक सिग्नल ओलांडत असल्यास नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा.

7.चिन्हे ओळखा: गाडी चालवायला शिकत असताना प्रथम वाहतूक चिन्हे ओळखायला शिका. लाल दिवा, हिरवा दिवा, डावे-उजवे, वळण, वाहनाचा वेग इत्यादीसाठी सिग्नल आणि संकेतकांचा वापर करणे अत्यंत गरजेचे ठरते.

8. सुरक्षित अंतर ठेवा: वाहनांमध्ये पुरेसे अंतर असावे. जेणेकरून समोरील वाहनाने अचानक ब्रेक लावल्यास मागून येणारी वाहनं त्याच्यावर आदळणार नाहीत.

9. हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा: जर तुम्ही दुचाकीवर असाल तर हेल्मेट घालणे सर्वात महत्वाचे आहे. डोकं वाचलं तर जीवही वाचू शकतो. त्याचप्रमाणे, जर तुम्ही घारचाकी वाहनात असाल तर तुम्ही सीट बेल्ट वापरलाच पाहिजे.

10. विनाकारण हॉर्न वाजवू नका: हॉर्न हा कोणत्याही वाहनाचा महत्त्वाचा भाग असतो. पण गरज असेल तेव्हाच हॉर्न वाजवा. गर्दी पाहून विनाकारण हॉर्न वाजवू नका. त्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते.

11. चालकाची प्रकृती चांगली असावी :  वाहतुकीचा आणखी एक नियम आहे. चालक निरोगी असावा, त्याचे डोळे पूर्णपणे ठीक असले पाहिजेत. चालक आजारी किंवा थकलेला असेल वाहन चालवू नये.

वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आले आहेत. याचे जाणीवपूर्वक पालन केले तर सुरक्षित प्रवास सर्वांनाच अनुभवता येईल.

#NationalHighwaysAuthorityofIndia #NHAI #MinistryOfRoadTransportAndHighways #MORTH

#NitinGadkari

मराठी बातम्या/ऑटो/
Road Safety Week 2025: रस्त्यावर कसेही चालू नका! हे वाहतुकीचे 11 नियम माहिती आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल