TRENDING:

ती आली, तिने पाहिलं आणि जिंकलं! Tata ची धाकड SUV शोरूमला पोहोचली, पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक बुकिंग

Last Updated:

टाटा मोटर्सची लिजेंड Tata Sierra अलीकडेच लाँच झाली. त्यानंतर आता ही एसयूव्ही टाटाच्या सर्व डिलरशीप आणि शोरूममध्ये पोहोचली आहे. Tata Sierra ला पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ती आली, तिने पाहिलं आणि जिंकलं...असंच टाटा मोटर्सच्या Tata Sierra बद्दल म्हणावं लागणार आहे. टाटा मोटर्सची लिजेंड Tata Sierra अलीकडेच लाँच झाली. त्यानंतर आता ही एसयूव्ही टाटाच्या सर्व डिलरशीप आणि शोरूममध्ये पोहोचली आहे. Tata Sierra ला पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहे. एवढंच नाहीतर पहिल्याच दिवशी तब्बल 70,000 पेक्षा जास्त लोकांनी Tata Sierra चं बुकिंग केलं आहे. त्यामुळे Tata Sierra ने मार्केटमध्ये एकच हवा केली आहे.
News18
News18
advertisement

टाटा मोटर्सने मागील महिन्यात आपली लिजेंड  Tata Sierra चं जोरदार कमबॅक केलं. टाटा सियारामध्ये नेहमीपेक्षा नवीन इंजिन दिलं आहे. यामध्ये ३ इंजिनचा पर्याय दिला आहे. त्यामुळे Tata Sierra ही एक पूर्णपणे वेगळी एसयूव्ही ठरली आहे. टाटाने Tata Sierra मध्ये 1.5 लिटर Kryojet Diesel, 1.5 लिटर TGDi हायपेरियन पेट्रोल आणि तिसरं 1.5 लिटर NA रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन हा पर्याय दिला आहे. Tata Sierra 2025 ही नवीन ARGOS आर्किटेक्चरवर तयार केली आहे.

advertisement

किंमत किती? 

Tata Sierra ची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. बेस मॉडेल असलेल्या स्मार्ट + स्टार्ट मॉडेल हे अवघ्या 11.49 लाख रुपये एक्स शोरूम मुंबई या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्ट + स्टार्ट व्हेरियंटमध्ये फ्लश डोअर, पुश स्टार्ट बटन आणि मागे लाँच डिएरल दिले आहे. या गाडीमध्ये सनरुफ दिला नाही. तसंच समोर ३ डिस्प्ले सेटही दिला नाही.  तर डिझेल मॉडेल हे १२.९९ लाखांपासून सुरू होतं आहे. सर्वात टॉप एन्ड मॉडेल हे १८.४९ लाखांपर्यंत असणार आहे.

advertisement

 EV Tata Sierra पुढील महिन्यात होणार लाँच

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऑफिस बॉय म्हणून केलं काम, ऊसतोड कामगाराचा मुलगा आज 2 कंपनीचा CEO
सर्व पहा

दरम्यान, टाटा मोटर्स आता Tata Sierra ही  EV मॉडेल सुद्धा लाँच करणार आहे.  Tata Sierra EV हे मॉडेल 2026 मध्ये लाँच होईल. ही ईव्ही  इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) एडल्ट प्रकार २०२७ च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. तसंच, टाटा मोटर्स Tata Sierra चं सीएनजी व्हेरियंट सुद्धा लाँच करण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि बजेट-फ्रेंडली ड्रायव्हिंगसाठी एक चांगला पर्याय मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
ती आली, तिने पाहिलं आणि जिंकलं! Tata ची धाकड SUV शोरूमला पोहोचली, पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक बुकिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल