बजाज पल्सर NS400Z
बजाज ऑटोने नुकतीच 'पल्सर NS400Z' ही नवी बाईक मार्केटमध्ये आणली आहे. 373 सीसी क्षमतेच्या सिंगल-सिलेंडर इंजिनसह ही बाईक 40 पीएस पॉवर आणि 35 एनएम टॉर्क तयार करते. सहा-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लच यामुळे राइडिंगचा अनुभव अधिक स्मूद होतो. तिचा टॉप स्पीड सुमारे 154 किमी प्रतितास असून किंमत 1.86 लाख इतकी आहे.
advertisement
( EMI न भरल्यास रिकव्हरी एजेंटने कार उचलून नेली? जाणून घ्या ग्राहकांचे अधिकार )
रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450
रॉयल एनफील्डही मागे नाही त्यांनी 'गुरिल्ला 450' नावाचा दमदार पर्याय ग्राहकांसमोर आणला आहे. 452 सीसीचे लिक्विड-कूल्ड इंजिन, 40.02 पीएस पॉवर आणि 40 एनएम टॉर्कसह ही बाईक तयार करण्यात आली आहे. 6-स्पीड गिअरबॉक्ससह ही बाईक सुमारे 140 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. गुरिल्ला 450 ची किंमत 2.39 लाख ते 2.54 लाख दरम्यान आहे.
ट्रायम्फ स्पीड 400
या दोन्ही ब्रँड्ससोबत आता ट्रायम्फही मैदानात उतरली आहे. त्यांच्या 'स्पीड 400' या बाईकने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. 398 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन, 40 पीएस पॉवर आणि 37.5 एनएम टॉर्कसह ही बाईक दमदार परफॉर्मन्स देते. स्पीड 400 चा टॉप स्पीड सुमारे 145 किमी प्रतितास असून स्टाईल आणि पॉवरचा परिपूर्ण मेळ तिच्यात पाहायला मिळतो.
हुस्कवर्ना स्वार्टपिलेन 401
स्वीडिश ब्रँड हुस्कवर्नाने ‘स्वार्टपिलेन 401’ ही दमदार बाईक भारतीय बाजारात आणली आहे. यामध्ये 398.63 सीसी क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन तब्बल 46 PS पॉवर आणि 39 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकमध्ये सहा-स्पीड गिअरबॉक्स आहे, तसेच बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टरसारखे प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. तिचा टॉप स्पीड सुमारे 160 किमी प्रतितास असून, भारतात ही बाईक ₹.96 लाख (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे.
KTM 390 Duke
KTM या लोकप्रिय ब्रँडने 390 Duke या बाईकसह तरुणांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. या बाईकमध्ये 398.6 सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 46 PS पॉवर आणि 39 Nm टॉर्क निर्माण करते. स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स या बाईकला अधिक स्मूद आणि अचूक गिअर शिफ्टिंगचा अनुभव देतो. KTM 390 Duke चा टॉप स्पीड अंदाजे 167 किमी/तास असून भारतात तिची किंमत 2.95 लाख (एक्स-शोरूम) आहे.
या सर्व बाईक्स 3 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळत असून प्रत्येक बाईक एक वेगळी राइडिंग अनुभूती देते. शहरातील ट्रॅफिकमध्ये वापरण्यास योग्य असलेल्या या बाईक्स त्यांच्याच लूक आणि परफॉर्मन्समुळे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. स्टायलिश लूक, प्रगत फीचर्स आणि दमदार इंजिन यामुळे ग्राहकांसाठी या बाईक्स आता 'बेस्ट बाई' ठरत आहेत.