यासगळ्यात एका तरुणाची हालत मात्र पूर्ण खराब झाली, एका स्कुटीच्या लाइट सिस्टममुळे त्याला आपण आता मरणार असंच काहीसं जाणवू लागलं. या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
खरंतर आता नवीन येणाऱ्या गाड्यांचं लाईट दिवसाही सुरु असतं आणि त्यांना बंद करण्याचा कोणताही पर्याय नसतो, याबद्दल तर तुम्हाला माहित असेल आणि हीच गोष्ट सध्याच्या परिस्थीतीमुळे एका तरुणीसाठी त्रासदायक ठरली.
advertisement
हा तरुणी आपली स्कुटी घेऊन कुठेतरी जात होता. पण त्यावेळी सर्वत्र अंधार होता. त्याला ही आपल्या गाडीची लाईट बंद करुन इच्छीत स्थळी लवकर पोहोचायचं होतं. पण गाडीची लाइट बंद होत नसल्यामुळे त्याच्यासाठी हे त्रासदायक ठरलं.
आता या स्कूटीवाल्याची अवस्था काही औरच झाली. व्हिडीओमध्ये तो घाबरलेला, हताश, आणि थेट म्हणतोय – "माझीच वाट लागणार, मीच पहिला मरेन!" कारण ब्लॅकआउटमधल्या अंधारात त्याची स्कूटी मात्र चकाकतेय आणि त्याला वाटतंय, शत्रूला सगळ्यात आधी तोच दिसणार.
आता हा व्हिडीओ नक्की युद्धादरम्यानचा आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही. पण जर विचार केला की अशी परिस्थीती खरोखर उद्भवली तर मात्र वाहनांच्या AHO या धोरणामुळे एखाद्यासाठी हे जीवघेणं ठरु शकतं.
काय आहे सरकारचं AHO धोरण?
भारत सरकारच्या उत्सर्जन (emission) धोरणामुळे बीएस-4 नंतरच्या सर्व वाहनांमध्ये AHO अनिवार्य झालं. सुरक्षेच्या दृष्टीने हे उपयुक्त मानलं जातं. दिवसा सुद्धा गाड्या स्पष्ट दिसाव्यात म्हणून ही प्रणाली गाडीमध्ये आणली गेली. पण अशा युद्धजन्य परिस्थितीत, जेव्हा सरकार स्वतः अंधारात राहा म्हणतंय, तेव्हा ही सुविधा श्राप वाटते.