TRENDING:

डोंगराळ रस्त्यावर अचानक का तुटते क्लच प्लेट? कार चालवत असाल तर कारणं जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं

Last Updated:

डोंगराळ भागात वळणावळवावर आणि चढण असलेल्या रस्त्यांवर कार चालवताना क्लच प्लेट तुटणं खूपच सामान्य आहे. पण असं का होतं आणि यामागची कारणं काय आहेत?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : डोंगराळ भागात वळणावळवावर आणि चढण असलेल्या रस्त्यांवर कार चालवताना क्लच प्लेट तुटणं खूपच सामान्य आहे. पण असं का होतं आणि यामागची कारणं काय आहेत? हे जाणून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे पुढच्यावेळी असा प्रसंग पुन्हा घडला तर त्यावर तोडगा काढता येईल.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

चला क्लच प्लेट तुटण्यामागची कारणं आधी जाणून घेऊ

1. हाफ क्लचचा वापर:

डोंगराळ भागात गाडी चढवताना हाफ क्लचचा उपयोग करावा लागतो. हे वारंवार केल्यामुळे क्लच प्लेटवर जास्त दाब येतो आणि घर्षण वाढल्याने ती लवकरच नुकसान पावते.

2. जास्त भार:

डोंगराळ रस्त्यांवर गाडी चढवताना इंजिनवर अतिरिक्त जोर येतो. या जोरामुळे क्लच प्लेटवरही अतिरिक्त ताण पडतो.

advertisement

3. वारंवार गियर बदलणे:

डोंगराळ रस्त्यांवर सतत गियर बदलणे आवश्यक असते. त्यामुळे क्लच प्लेटवर सतत काम होत असते आणि तिच्यावरची ताण वाढतो.

4. चुकीचा गियर वापर:

अयोग्य गियर निवडल्यास क्लच प्लेटवर अनावश्यक दबाव येतो, ज्यामुळे ती लवकर खराब होऊ शकते.

5. आधीपासून खराब किंवा कमजोर क्लच प्लेट:

जर क्लच प्लेट आधीच खराब आहे तर डोंगराळ रस्त्यावर तिचे नुकसान होणे निश्चित असते.

advertisement

6. कमी दर्जाचे इंजिन तेल:

गाडीतील इंजिन तेल कमी दर्जाचे असेल तर ते क्लच प्लेटला व्यवस्थित ल्युब्रिकेट करू शकत नाही. ज्यामुळे प्लेटवर घर्षण वाढते आणि तिचे आयुष्य कमी होते.

आता या समस्येपासून बचावासाठी उपाय काय?

हाफ क्लचचा वापर कमी करा: शक्य तितका पूर्ण क्लच वापरून गाडी चालवा.

गरज असेल तर गियर बदला, केवळ आवश्यकतेनुसारच गियर बदलण्याचा सल्ला देण्यात येतो.

advertisement

दर्जेदार क्लच प्लेट लावा: विश्वसनीय ब्रँडची आणि दर्जेदार क्लच प्लेट निवडा.

चांगले इंजिन तेल वापरा: उच्च दर्जाचे इंजिन तेल वापरल्याने क्लच प्लेटची योग्य काळजी घेतली जाते.

इंजिन ब्रेकचा वापर: क्लच प्लेटचे नुकसान टाळण्यासाठी इंजिन ब्रेकचा योग्यरित्या वापर करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

तुरतच मेकॅनिकशी संपर्क: जर आपल्याला वाटले की क्लच प्लेट खराब झाली आहे तर ताबडतोब तज्ञ मेकॅनिकशी संपर्क साधा.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
डोंगराळ रस्त्यावर अचानक का तुटते क्लच प्लेट? कार चालवत असाल तर कारणं जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल